१८ जुलै २०१८ रोजी हॉटेल गारवाचे मालक रामदास आखाडे यांचा त्यांच्या हॉटेल जवळ कोयता आणि तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आला होता. या घटनेत. रामदास आखाडे गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपाचार सुरू असताना यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत घटनेतील आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यात बाळासाहेब खेडेकर आणि त्यांचा मुलगा आणि आणखी दहा जणांवर गुन्हा दखल करण्यात आला होता. यातील सर्वांवर मोक्का लावण्यात आला होता.
उरुळी कांचन येथील हॉटेल गारवा चे मालक रामदास आखाडे यांच्यावर १८ जुलै २०२१ रोजी त्यांच्याच हॉटेलच्या परिसरामध्ये कोयता आणि धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला होता. ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर रामदास आखाडे यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. खुनी हल्ल्यानंतर बाळासो खेडेकर आणि त्यांच्या मुलासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये या सर्वांना मोक्का लावण्यात आला होता.
बाळासाहेब खेडेकर यांच्या हॉटेल जवळच रामदास आखाडे यांचे हॉटेल गारवा होते. गारवा हॉटेल चांगले सुरू होते. त्यामुळे खेडेकर यांचा हॉटेल व्यवसाय चालत नव्हता. त्यातूनच बाळासाहेब खेडकर यांनी त्यांच्या मुलासोबत घेऊन आखाडे यांच्यावर कोयता आणि तीक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र आता या हत्येतील आरोपी असलेले बाळासाहेब खेडेकर यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.