• Sat. Sep 21st, 2024
बहिणीला भेटून मावशी भाच्यासोबत निघाली, मात्र खड्ड्याने घात केला, हृदयाला घरं पाडणारा शेवट

छत्रपती संभाजीनगर : भाच्यासोबत बाईकवरुन जात असताना दुचाकी खड्ड्यात आदळली. त्यामुळे मागे बसलेली वयोवृद्ध महिला दुचाकीवरून खाली कोसळली, दुर्दैवाने यावेळी भरधाव वेगात आलेल्या चारचाकी वाहनाने महिलेला चिरडले अन् तिचा मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजीनगर येथील छावणी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये घडली.

या प्रकरणी छावणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धोंडाबाई नारायण खैरनार (वय ६३ वर्ष, रा. चाळीस गाव वाघोळी) असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. धोंडाबाई या चार दिवसांपूर्वी पडेगाव भागामध्ये राहणाऱ्या बहिणीला भेटण्यासाठी आल्या होत्या. बहिणीची भेट झाल्यानंतर चाळीसगाव येथे नातेवाईकांच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे त्या छावणी येथून भाच्याच्या दुचाकीवर चाळीसगावकडे एमएच २० डी झेड ४०९४ या दुचाकीवर बसून मध्यवर्ती बस स्थानकाच्या दिशेने जात होत्या.

पतीच्या इंजेक्शनसाठी पैसे कमी पडले, महिलेने हॉस्पिटलबाहेर भीक मागितली, नवऱ्याचे प्राण वाचवले
यावेळी धोंडाबाई भाच्याच्या दुचाकीवरून जात असताना दुचाकी खड्ड्यात आढळली. यामध्ये दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या धोंडाबाई दुचाकीवरून खाली कोसळल्या. यावेळी भरधाव येणाऱ्या (एमएच ०४ इ टी ८८७४) या चारचाकी गाडीने धोंडाबाई यांना वाहनाखाली चिरडले.

ट्रक चालकाचा यूटर्न बेतला जीवावर, रिक्षा चालकाचा चिरडून दुःखद अंत
यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेची माहिती मिळतात छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस केशव काळे यांनी त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले

अवघ्या ३ सेकंदांचा अपघात, मुलगा ब्रेन डेड; कुटुंबाचा एक निर्णय देणार ७ जणांना जीवनदान

दरम्यान धोंडाबाई यांच्या मृत्यूची माहिती कळताच नातेवाईकांनी टाहो फोडला. धोांडाबाई यांच्या पश्चात तीन मुले आहेत. अपघात प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यामध्ये कार चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed