म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा विषय लवकर सोडविण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा मराठा समाज पेटून उठेल व त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, याची सर्व जबाबदारी राज्य सरकारवर राहिल, असा इशारा इशारा महाराष्ट्र कांती सेनेचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी दिला.
सुरेश दादा पाटील यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, “मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील अकरा दिवसापासून प्राणांतिक उपोषणास बसलेले आहेत. मात्र, राज्य सरकार जाणून बुजून वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवितास धोका निर्माण होणार असल्याची भीती मराठा समाजामध्ये आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे नेतृत्व कोणीही करू दे पण मराठा आरक्षणाचा पश्न सुटला पाहिजे. ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणावरती राजकारण करू नये. मंत्री छगन भुजबळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करावी. त्यांनी तळ्यात मळ्यात भूमिका घेऊ नये”.
पक्षाची प्रतिमा मलिन होतीये, पक्षाध्यक्षांना पत्र लिहिणार, संजय काकडे नितेश राणेंच्या पुण्यातील भाषणावर संतापले
पाटील म्हणाले, “आज अनेक पक्षातले सर्व नेते मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे म्हणून भांडतायेत. पण त्यांचा खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पाठिंबा आहे का? हे शोधले पाहिजे. की फक्त मतं मागण्यासाठी केले जाणार नाटक आहे याचे चिंतन येणाऱ्या काळात केलं पाहिजे”.
विखेंच्या अंगावर भंडारा फेकणाऱ्याला भाजप शहराध्यक्षांनी तुडवला पण काही तासांतच माफी मागितली, नेमकं काय घडलं?
आरक्षणप्रश्नी राज्य सरकार आणखी किती लोकांचा बळी घेणार? असा सवाल करून ते म्हणाले, नोकरी, शिक्षण, आरोग्य आणि उद्योग या क्षेत्रामध्ये मराठ्यांना प्रगती करायची असेल तर मराठा समाजाला आरक्षणाशिवाय पर्याय नाही. काकासाहेब शिंदे यांचा बळी मागील वर्षी असाच सरकारच्या चुकीमुळेच गेला. जर मनोज जरांगे पाटलांना काही झालं तर त्याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासनावर असेल असा इशाराही त्यांनी दिला. या पत्रकार परिषदेसाठी भरत पाटील, जयदीप शेळके, प्रसाद लाड, मधुकर पाटील, युवराज पाटील आदी उपस्थित होते.
लांडगा काकाच्या नादाला लागू नका, धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गोपीचंद पडळकरांचा पवारांवर निशाणा