• Sat. Sep 21st, 2024
गावी जाण्यासाठी निघाले; रेल्वे स्थानकावर पोहोचले, मात्र डोळा लागला अन् अनर्थ, काय घडलं?

मुंबई: लोकमान्य टिळक टर्मिनसमधील प्रतीक्षागृहात गाडीची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशाचा डोळा लागला. त्यानंतर क्षणार्धात चोरट्याने त्यांचा मोबाइल लांबवला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाल्याने चोर स्थानकाबाहेर पडण्याआधीच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाच्या तावडीत सापडला. रेल्वेच्या प्रतीक्षागृहात गाडी फलाटावर लागण्याची वाट पाहणारे अनेक प्रवासी बसलेले असतात. त्यांच्याकडे सामानासह मोबाइलसारख्या मौल्यवान वस्तू असतात. प्रवाशांनी मोबाइल आणि बॅगेवर लक्ष ठेवले नाही तर चोरी होण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत.
गर्भवतीच्या प्रसूतीमध्ये गुंतागुंत; तीन खासगी रुग्णालयांनी उपचार नाकारला, ‘असा’ वाचला दोघांचा जीव
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर येथे राहणारे प्रकाश चांदुर हे रेल्वेने गावी जाण्यासाठी ५ सप्टेंबरच्या मध्यरात्री साडेबारानंतर लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात पोहोचले. गाडी येण्यास उशीर होणार असल्याने नव्या तिकीट आरक्षित सभागृहात ते गाडीची वाट पाहत बसले होते. गाडीची वाट पाहत असताना त्यांचा डोळा लागला. काही मिनिटांनी त्यांना जाग आली असता त्यावेळी मोबाइल चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क केला. आरपीएफने नव्या सभागृहातील सीसीटीव्ही तपासले असता आरोपी जितेश फुलवारिया (२२) हा चांदुर यांना झोप लागलेली असताना त्यांच्या आसपास वावरत असल्याचे दिसून आले.

आमदार प्रशांत बंब आणि शिक्षिकेत भरसभेत हमरीतुमरी, व्हिडिओ व्हायरल

त्यानंतरही अन्य प्रवाशांचे सामान चोरी करण्याच्या तिथेच उद्देशाने फिरत असताना फुलवारिया दिसताच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला बेड्या ठोकल्या. लोकमान्य टिळक टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण, पनवेल या मोठ्या स्थानकांतून रात्रभर रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरू असते. स्थानकात वाट पाहणाऱ्या प्रवाशांनी प्रतीक्षागृहातच बसावे. आपल्या बॅगासह अन्य मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी आणि रेल्वे सुरक्षा दलाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed