भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या महिला नेत्या सना खान आणि जबलपूरचा कुख्यात गुन्हेगार अमित ऊर्फ पप्पू साहू यांचे प्रेम प्रकरण सुरू होते. घरच्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून सना आणि अमितने लग्न केले. मात्र, अमित साहू यांना सना खानच्या राजकीय कारकिर्दीच्या जोरावर राजकारणात प्रवेश करायचा होता. त्यामुळे अमित सनाला काही राजकीय नेत्यांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून. काहींशी शारीरिक संबंधांच्या चित्रफित तयार केल्या होत्या आणि व्हिडिओ प्रसारित करून राजकीय कारकीर्द संपवण्याची धमकी देऊन अनेकांकडून लाखो रुपये रूपयांची खंडणी मागितली.
सना खानची जबलपूर येथे २ ऑगस्ट रोजी अमितने डोक्यात काठीने वार करून हत्या केली होती. सनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अमितने त्याचा नौकर जितेंद्र गौर, धर्मेंद्र यादव, राकेश सिंग, कमलेश पटेल आणि रब्बू उर्फ रविकिशन यादव यांना बोलावले.
दरम्यान, घरातील काम करण्यासाठी अमितची मोलकरीण अमितच्या घरी आली. तीने दार उघडले तेव्हा तिला सनाचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसला. सनाचा मृतदेह पाहून ती घाबरली. ती लगेच उलट्या पावलांनी आपल्या घरी पळाली आणि त्या दिवसानंतर ती अमितच्या घरी परत आलीच नाही. नागपूर पोलिसांना तपासात मोलकरणीची तार सापडली. त्यांनी मोलकरणीला शोधून तिला विचारपूस केली. तिने घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला असून ती या खूनाची एकमेव साक्षीदार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
अद्याप मृतदेह सापडला नाही…
दोन दिवसांपूर्वी नागपूर शहर पोलीस दलाचे दोन उपायुक्त जबलपूरला गेले होते. ज्या ठिकाणी या संघाने सनाची हत्या केली. तिथे रक्ताचे नमुने घेण्यात आले. सनाच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके २७ ऑगस्ट रोजी जबलपूरला गेली होती. पोलिसांनी हिरण नदी आणि नर्मदा नदीच्या संपूर्ण खोऱ्यात शोध घेतल्यानंतरही सनाचा मृतदेह सापडला नाही.