रायगड: रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चालले गुन्हेगारीचे प्रमाण हे मोठे चिंताजनक ठरले आहे. माणगाव तालुक्यात अशीच एक संतापजनक घटना घडली आहे. पतीनेच पत्नीचा खून केल्याने माणगांव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मयत शारदा गणेश चव्हाण आणि आरोपी गणेश चव्हाण हे नात्याने पती आणि पत्नी आहेत. मयत पत्नीचे दुसऱ्या माणसाबरोबर प्रेम संबंध आहेत असा संशय गणेशला होता. १ सप्टेंबर रोजी ७ वाजताच्या सुमारास मौजे इंदापूर गावच्या हद्दीत आरोपीने संशयाचं भूत डोक्यात भरल्याने रागाच्या भरात पत्नी शारदा चव्हाणला हाता, पायाने आणि काठीने जबर मारहाण केली. त्याने तिच्या हात पाय आणि छातीवर मारहाण केली. इतकेच नव्हे तर सैतान झालेल्या पतीने पत्नीचे डोके रेल्वे सिमेंट स्टोन कॉलम नं.१०४ वर आपटून तिला ठार मारले. यानंतर त्याने तिला नदी किनारी टाकून दिले.

त्यानंतर आरोपी गणेश चव्हाण याने त्याची पहिली पत्नी शेवंता वाघमारे आणि तिच्या नातेवाईकांनी शारदा चव्हाण हिचा खुन केला अशी १०० नंबरला खोटी माहिती देऊन तसा खोटा बनाव रचला. पण, माणगाव पोलिसांना या सगळ्या प्रकरणात पतीवर संशय आला होता. पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केल्यावर अखेर नराधम पती गणेशने केलेल्या या भयंकर कृत्याची कबुली दिली.
या गुन्ह्याची नोंद माणगांव पोलिस ठाण्यात करण्यात आली असून संशयित आरोपी गणेश चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास माणगाव तालुका पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किर्तीकुमार गायकवाड करीत आहेत.