• Sat. Sep 21st, 2024
शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला अनर्थ; शाळेत जाण्यासाठी निघाल्या; मात्र वाटेतच नियतीनं साधला डाव

चंद्रपूर: उद्या (मंगळवार) ५ सप्टेंबर शिक्षक दिन. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला चंद्रपुरात दुर्दैवी घटना घडली. या घटनेने शिक्षण विभागात शोककळा पसरली आहे. शाळेत जायला निघालेल्या एका शिक्षिकेचा अपघाती मृत्यू झाला आहे. अनिता किशोर ठाकरे (४८) असे मृतक शिक्षिकेचे नाव आहे. त्या लखमापूर जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होत्या. अपघाताची घटना चंद्रपूर-नागपूर महामार्गावर घडली आहे.
नियतीचा खेळ! कमी वयात कुटुंबाचा गाडा ओढला; ८ महिन्यांपूर्वीच लग्न, पण कामावर जातानाच घडला अनर्थ, अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला शिक्षिकेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मृतक महिलेचं नाव अनिता किशोर ठाकरे (४८) असे आहे. त्या शहरातील श्रीकृपा कॉलोनी, जगन्नाथ बाबा नगर चंद्रपूर येथे वास्तव्याला होत्या. त्या जिल्हा परिषद शाळा लखमापूर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. सकाळी त्या शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या. चंद्रपूर-नागपूर मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंप जवळ अचानक भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने ठाकरे यांच्या दुचाकी वाहनाला धडक दिली.

आमदार अभिमन्यू पवारांच्या माणुसकीचं दर्शन; अपघातग्रस्तांना स्वत: च्या गाडीतून रुग्णालयात नेलं

या धडकेत शिक्षिका ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यावर ट्रक चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे. जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करा, अशा सूचना पोलीस विभागाकडून वारंवार दिल्या जातात. मात्र या या सूचनांकडे वाहनचालक दुर्लक्ष केल्यामुळे अपघाताच्या घटनांत वाढ झाल्याचे आता बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed