• Sat. Mar 7th, 2026
    संतापलेल्या मराठा आंदोलकांची रस्त्यावर मोठी गर्दी, पण अचानक अॅम्ब्युलन्स आली, पुढे काय घडलं?

    अहमदनगर : जालन्यात पोलिसांकडून झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यात मराठा आरक्षण आंदोलन आक्रमक होत असल्याचं चित्र आहे. अंबड तालुक्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आक्रोश मोर्चावर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी बंद पुकारले जात आहेत. काही मराठा बांधव संताप व्यक्त करत आपली वाहने पेटवून देत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही या घटनेची पडसाद उमटले असून लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज नेवासा फाटा येथे छत्रपती संभाजी नगर ते पुणे महामार्गावर आयोजित करण्यात आलेल्या रास्ता रोकोला मराठा समाजाबरोबरच सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी उपस्थित राहून आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केला.

    रास्ता रोको आंदोलनावेळी अनेक मराठा आंदोलक रस्त्यावर बसले होते. मात्र दुपारच्या सुमारास एक अॅम्ब्युलन्स आली. यावेळी मराठा बांधवांनी प्रसंगावधान दाखवत त्वरित रस्ता मोकळा करून देत माणुसकीचे दर्शन घडवले. त्यानंतर अॅम्ब्युलन्समधील रुग्णाच्या नातेवाईकांनीही या आंदोलकांचे आभार मानले.

    Uddhav Thackeray : …तेव्हा विकेटकीपर काय करत होते? अजित पवारांसह शिंदे फडणवीसांवर उद्धव ठाकरेंचा पलटवार

    दरम्यान, या आंदोलनादरम्यान मराठा मोर्चाचे समन्वयक गणेश निमसे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, शिवसेनेचे शाखाप्रमुख गणेश झगरे, पी आर जाधव, गणेश चौगुले, बालेन्द्र पोतदार, रावसाहेब घुमरे, सुदाम कापसे, बन्सी सातपुते आदींनी तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आपला लढा असाच सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed