• Sat. Sep 21st, 2024

ऑनलाइन मोबाइल मागवला, पण मिळाला फरशीचा तुकडा अन् साबण; अखेर भामटे पोलिसांच्या ताब्यात

ऑनलाइन मोबाइल मागवला, पण मिळाला फरशीचा तुकडा अन् साबण; अखेर भामटे पोलिसांच्या ताब्यात

पुणे : ई-कॉमर्स कंपनीकडून ऑनलाइन मोबाइल विकत घेणाऱ्या ग्राहकांना मोबाइलऐवजी फारशीचा तुकडा, साबणाची वडी आणि बंद पडलेले मोबाइल देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक दोनने चार डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. आरोपींकडून चार लाख ५१ हजार ४३ रुपयांचे १९ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

काय घडलं?

मोईन मंहमद हलीम सय्यद (वय ३०, रा. तळेगाव दाभाडे), आकाश राजकुमार निकम (वय ३२, विमाननगर), रंजितकुमार राजगिर (वय २५, महंमदवाडी) आणि तुकाराम कृष्णा चौगुले (वय ३०, रायकरमळा, धायरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत.

हडपसर येथे ऑनलाइन मोबाइल मागवणाऱ्या ग्राहकांना मोबाइलऐवजी फरशीचे तुकडे, साबणाच्या वड्या, बंद पडलेले मोबाइल मिळाल्याच्या तक्रारी हडपसर पोलिस ठाण्यात आल्या होत्या. खंडणीविरोधी पथकाकडून समांतर तपास सुरू असताना पोलिस अंमलदार विनोद साळुंके आणि अमोल पिलाने यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नामांकित डिलिव्हरी कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. या वेळी हा प्रकार उघडकीस आला. आरोपी डिलिव्हरी कंपनीकडे स्कॅनर, डिलिव्हरी बॉय, चालक म्हणून काम करतात. मोबाइल शॉपीमधून मोबाइल घेतल्यानंतर बॉक्समधून मोबाइल काढून त्यामध्ये फरशीचे तुकडे, साबणाच्या वड्या ठेवून ते ग्राहकांना देण्यात आले होते.
Explainer : इथेनॉलवर पूर्णपणे चालणारी जगातील पहिली कार भारतात, फायदे मोठे, मग आक्षेप का?
पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, पोलिस अंमलदार विनोद साळुंके, ईश्वर आंधळे, अनिल मेंगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed