• Sat. Sep 21st, 2024
जरा काम आहे जाऊन आलोच; पित्याचं लेकरांना वचन, परतत असताना नियतीने साधला डाव

लातूर: जिल्ह्यात अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दरम्यान अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात एका कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात नांदेडच्या मुकींद उत्तम जाधव (३९) या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
तरुण दारूच्या नशेत तर्राट; रुळावर जाऊन झोपला, रेल्वेचे तीन डबे अंगावरून गेले, अन् नंतर जे घडलं त्यानं…
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात असणाऱ्या हिराबोरी तांडा येथील रहिवाशी असलेला ३९ वर्षीय मुकींद उत्तम जाधव हा लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात एम एच २६ बी एम २५५८ या क्रमांकाच्या दुचाकीवरून आला होता. याच दुचाकीवरून तो रात्रीच्या वेळी परत आपल्या गावी जात असताना परचंडा पाटीजवळ समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एम एच २४ व्ही ६८४८ या क्रमांकाच्या कार चालकाने समोरून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात मुकींद उत्तम जाधव याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच किनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. दरम्यान मुकींदच्या कुटुंबियांना कळविण्यात आले. मुकींद जाधव यांच्यावर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणी मुकींदचे वडील उत्तम जाधव यांच्या तक्रारीवरून किनगाव पोलीस ठाण्यात कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदारे करत आहेत. दरम्यान मुकींद यांच्या पदरात एक मुलगी दोन मुलं आहेत. तीन भावामध्ये दोन एकर शेती, आई वडील, तीन भावजया आणि पुतणे असा त्यांचा परिवार आहे. दोन एकर शेतीवर संसाराचा गाडा हाकायचा कसा, त्यामुळे हे कुटुंब ऊसतोड तसेच शेतमजूरीच्या कामावर जात असे.

साखर झोपेतच सगळं संपलं; कश्मीरवरून आले, झोपले ते उठलेच नाहीत; पिंपरीत आगीत होरपळून अख्खं कुटुंब गेलं

मुलांनी मात्र शिकून मोठं साहेब व्हावं असं त्याच स्वप्न होतं. हे स्वप्न सत्यात उतरावं, मुलांना शिकवावं म्हणून तो काबाडकष्ट करायचा, दिवसरात्र एक करून अनेक वेळा मजुरीला जायचा. जरा काम आहे आलोच जाऊन, म्हणून तो दुपारी दोन वाजता घराच्या बाहेर पडला. मात्र आला तो त्याचे अपघाती निधन झाल्याचाच निरोप. घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आईच्या काळजाचा तुकडा असा रस्त्यावर चिरडला गेला, तीन मुलं उघड्यावर टाकून मुकींदा हे जग सोडून गेला. बायकोच्या जगण्याचा आधार गेला. या घटनेने हिराबोरी तांड्यावर एकच रडारड सुरु झाली होती. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed