• Sat. Sep 21st, 2024

स्वातंत्र्यपूर्व काळापासून पंरपरा जपली,किसन हलवाई पेढा वाढवतोय बहीण भावाच्या नात्याची गोडी

स्वातंत्र्यपूर्व काळापासून पंरपरा जपली,किसन हलवाई पेढा वाढवतोय बहीण भावाच्या नात्याची गोडी

लातूर : कौतुकाचा, आनंदाचा क्षण साजरा करायचा म्हटलं की पेढा भरवून तोंड गोड करणं आलंच. कित्येकांच्या कित्येक आनंदी क्षणाचा लातूरमधील किसन हलवाई यांच्या दुकानातील पेढा साक्षीदार झालाय. अगदी स्वातंत्र्य पूर्व काळापासून ही परंपरा सुरु आहे. अगदी लातूर शहर जिल्ह्यातूनच नव्हे तर पर जिल्ह्यातही या किसन हलावाईच्या पेढ्याला मोठी मागणी आहे. कारण एकच घोटून केलेल्या खाव्याच्या अवीट चवीची गोडी आता लातूरमधील चौथी पिढी अनुभवतेय. रक्षा बंधनाच्या निमित्ताने हे पेढे खरेदीसाठी चांगलीच गर्दी दिसून आली.

किसन हलवाई यांचे मुळ आडनाव पाचंगे. तसे ते मूळचे महाराष्ट्र सीमा लगत असलेल्या कर्नाटक राज्यातील बसवकल्याणचे मात्र काही करणानिमित्त ते कुटुंबीयांसह लातूरला आले. चार मुले, पत्नी संसाराचा गाडा कसा हाकायचा म्हणून त्यांनी चार म्हशी घेऊन दुधाच्या व्यवसायाला सुरुवात केली. चार म्हशीचे दूध रोज विक्री व्हायला आजच्यासारखी तत्कालीन परिस्थिती नव्हती. अनेकांच्या घरी दुभती जनावरे असल्याने आनेक वेळा चार म्हशीचे दूध पूर्ण विक्री व्हायचे नाही. उरलेल्या दुधाचं दही, तूप ते करत असत. पहाटे लवकर उठून म्हशीच्या धारा काढणे, वैरण पाण्याची सोय करणे, दूध घालुन येणे यामधून त्यांना दुपारी थोडी उसंत मिळत असे. त्यामुळे विरंगुळा म्हणुन ते मित्रासोबत गप्पा मारायला जायचे. मित्र हॉटेलिंगचा व्यवसाय करत असल्याने किसन यांनी या वेळेचा सदउपयोग करत खव्यापासून पेढे बनवायला शिकणं पसंत केलं.

ते आता उरलेल्या दुधाचे ते पेढे बनवू लागले. घरच्या म्हशीचे घट्ट दूध उपलब्ध असल्याने घोटुन केलेल्या खाव्याला वेगळीच गोडी येऊ लागली अन भेसळमुक्त खव्याची गोडी लातूरकरांच्या जिभेवर रेंगाळू लागली. त्यामुळेच कौतुकाच्या, आनंदाच्या अन् सण उत्सवाच्या वेळी आवर्जून किसन पाचंगेच्या पेढ्यांची आठवण होऊ लागली. लातूरकरांची सणाच्या दिवसात त्यांच्या दुकानाकडे पावले न वळली तरच नवल म्हटलं जातं.
Sharad Pawar Retirement: शरद पवारांचे वय झाले, त्यांनी निवृत्ती घ्यावी; पुण्यात वर्ग मित्राचा सल्ला
लातूर बाजारपेठेचे शहर असल्याने इथे व्यापारामित्त व्यापारी तसेच परिसरातील शेतकरी बाजार हाट करण्यासाठी अनेक जण लातूरला येतात. त्यांनाही या पेढ्याची चटक लागली. लातूरला गेलं की घरी जाताना किसन यांच्या दुकानातून ते हमखास पेढा नेऊ लागले अन् हा हा म्हणता किसन पाचंगे हे किसन हलवाई म्हणून ओळखले जाऊ लागले.
फडणवीसांना ‘ती’ माहिती मिळाली नाही, प्रकाश आंबेडकर यांचा कोरेगाव भीमा प्रकरणी मोठा दावा, काय म्हणाले…
आता या व्यवसायात त्यांची चौथी पिढी उतरली आहे. आता पेढ्या सोबत इतर मिठाई, खारा, बाकरवडी असे पदार्थही ही पिढी विक्री करते. मात्र अधिक मागणी खव्याच्या पेढ्यांनाच आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही अवीट गोडी चौथी पिढी टिकवून आहे. मात्र या पुढच्या पाचव्या पिढीला शिकून डॉक्टर व्हायचं आहे. आम्ही हा व्यवसाय म्हणून नाही तर पिढ्यान् पिढ्या चालत आलेला गोडवा वाढविण्याच काम केलंय. पुढची पिढी काय करते ते पाहू असं चौथ्या पिढीतील श्रीकांत पाचंगे ( हलवाई ) यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनशी बोलताना सांगितले अन ते पुन्हा ग्राहकांना अवीट गोड पेढा देण्यात मग्न झाले. रक्षा बंधन सणाच्या निमित्ताने भाउ बहिणीच्या अतूट बंधनाची गोडी वाढविण्यासाठी किसन हलवाईचाच पेढा हवा म्हणुन ग्राहकांनीही गर्दी केली होतीच.
दणदणीत विजयासह पाकिस्तानने भारताला दिला इशारा, Asia Cup 2023 ची धडाक्यात सुरुवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed