• Sat. Sep 21st, 2024
खेळताना १२ वर्षाचा मुलगा पडला, उलटी झाली अन् मग बेशुद्ध झाला; डॉक्टरकडे नेताच घडलं भयंकर…

रत्नागिरी : कोकणात १२ वर्षीय पारस प्रदीप घवाळी या चिमुकला खेळता-खेळता पडल्याने त्याला उलटी झाली. तो घरी गेल्यावर बेशुद्ध झाला. क्षणभर कुटुंबिय घाबरले. त्याला तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असतानाच दुर्दैवीरीत्या सोमवारी रात्री उशिरा त्याचं निधन झाल्याची घटना घडली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील ओरी गावातील घवाळवाडीतील १२ वर्षीय मुलगा सोमवारी २८ ऑगस्ट रोजी मित्रांसोबत खेळताना पडला. हे निमित्त झालं. त्याच्या बरोबरच्या मित्रांनी त्याला लगेच पाणी पाजलं. यानंतर पारस येथून स्वतः घरी गेला. मात्र, तो घरी गेल्यावर पुन्हा बेशुद्ध पडला. घरच्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं मात्र यात त्याचा आकस्मिक मृत्यू झाला.

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनला बहिणीची भावाला अनोखी भेट, असं गिफ्ट दिलं की वाचून डोळे पाणावतील
सदर घटना सोमवारी (दि.२८ ऑगस्ट २०२३ ) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारस घवाळी हा जवळच कृष्णा सिताराम पातये यांच्या गुरांच्या गोठ्यात मित्रांसोबत खेळत होता. खेळता-खेळता तो खाली पडून लगेच त्याला उलटी झाली. उलटी आल्याने त्याला मित्रांनी लगेचच पाणी पाजले. यानंतर पारस हा तिथून स्वतः घरी आला. दरम्यान, घरी आल्यावर तो बेशुध्द पडला. घरच्यांनी त्याला तात्काळ उपचाराकरिता जवळच्या जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं.

रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून अधिक उपचाराकरिता त्याला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात सांगितले. त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रातून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान २८ ऑगस्ट रोजी सोमवारी रात्री १० वाजण्याच्या दरम्यान पारसची प्राणज्योत मावळली. या घटनेने ओरी गाव परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या सगळ्या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.

Crime Diary : अँकरच्या बॉडीवरून शेकडो वाहनं गेली आणि ५ वर्षांनी…; हत्येची कहाणी वाचून दृश्यम आठवेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed