• Mon. Nov 25th, 2024

    मान्सूनचा ब्रेक, ऑगस्टमध्ये ६० टक्के तूट, गतवर्षीच्या तुलनेत ५० पट टँकर सुरु, पावसाचं कमबॅक कधी?

    मान्सूनचा ब्रेक, ऑगस्टमध्ये ६० टक्के तूट, गतवर्षीच्या तुलनेत ५० पट टँकर सुरु, पावसाचं कमबॅक कधी?

    मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसानं उघडीप दिली आहे. जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळं जून महिन्यातील तूट भरुन निघाली होती. गत ५ वर्षाच्या आकडेवारीचा विचार केला असता यंदा कमी पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसानं ब्रेक घेतला आहे. १ ते २५ ऑगस्ट तारखेच्या आकडेवारीनुसार या महिन्यातील पावसाची तूट ही ६० टक्क्यांवर गेलेली आहे. १ जून ते २५ ऑगस्ट या दरम्यानच्या पावसाची तूट ही १४ टक्क्यांवर पोहोचली आहे.

    २०२२ चा विचार केला असता गेल्या वर्षी राज्यात ऑगस्ट महिन्यात २९ गावांमध्ये टँकर सुरु होते. यंदा ही संख्या १७६६ टँकर्सवर पोहोचली आहे. सर्वाधिक टँकर पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहेत. पश्चिम महाराष्ट्रात १७६, उत्तर महाराष्ट्रात १३५ टँकर सुरु आहेत.

    केंद्र सरकारकडून देशभरातील पावसाच्या तुटीचा आढावा घेण्यात आला आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये पावसाची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं पीक विमा कंपन्यांना देखील पिकांची स्थिती कशी राहते या संदर्भात माहिती घेण्यास सांगितलं आहे.

    यंदाच्या पावसाळ्याच्या मध्यावर पावसानं ब्रेक घेतल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील ३७६ मंडळांमध्ये गेल्या २१ दिवसांपासून पाऊस झालेला नाही. छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, परभणी, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, अहमदनगर, जळगाव, धुळे, नाशिक आणि बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

    राज्यात जुलै महिन्यात ३९ टक्के अधिक पावसाची नोंद झाली होती. ऑगस्ट महिन्यात गेल्या २१ दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं मातीमधील आर्द्रता कमी झाली आहे. याचा परिणाम शेतीच्या उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा डाळींच्या पिकांची २५ टक्के पेरणी कमी झाली आहे. तर, ज्वारीचं क्षेत्र ६२ टक्के तर बाजरीचं पीक ४६ टक्के घटलं आहे.
    भारत सूर्याच्या किती जवळ जाणार, L1 म्हणजे काय? जाणून घ्या इस्रोच्या आदित्य-L1 बाबत सर्व माहिती

    अधिकाऱ्यांनी पावसानं उघडीप दिल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ, शकतो अशी भीती व्यक्त केली. तर, शेतकऱ्यांचं देखील नुकसान होऊ शकतं.
    KL Rahul Injury: आशिया कपच्या आधी भारताला मोठा झटका; स्टार खेळाडू पहिल्या २ सामन्यातून बाहेर झाला

    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पिकांना वाचवण्यासाठी हलक्या स्वरुपाचं सिंचन करावं, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

    LPG Price: गृहिणींसाठी आनंदवार्ता! सिलेंडर २०० रुपयांनी स्वस्त होणार, निवडणुकीच्या तोंडावर महागाईत दिलासा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *