• Sat. Sep 21st, 2024

ग्रामपंचायतीविरोधात तरुणांचं शोले स्टाईल आंदोलन, १४ जण टॉवरवर चढले अन् नंतर घडलं असं…

ग्रामपंचायतीविरोधात तरुणांचं शोले स्टाईल आंदोलन, १४ जण टॉवरवर चढले अन् नंतर घडलं असं…

म. टा. वृत्तसेवा, निफाड : ग्रामपंचायतीच्या विकासकामांत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत मरळगोई खुर्द येथील तरुणांनी मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले होते. गैरव्यवहार प्रकरणावर चौकशी समिती नेमून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून मिळाल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार प्रकरणी व्यथित झालेल्या प्रसाद फापाळे यांच्यासह चौदा तरुणांनी उपमुख्यकार्यकरी अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाची पूर्वकल्पना दिली होती. तरीही कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने शनिवारी सकाळी आठ वाजता चौदा तरुण मोबाइल टॉवरवर चढले होते. या ठिकाणाहून त्यांनी सोशल मीडिया लाइव्ह सुरू केले. त्यामुळे आंदोलनाची माहिती जिल्हाभर पसरली. भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीवर आंदोलनकर्ते ठाम असल्याने सायंकाळपर्यंत तोडगा निघू शकला नव्हता.

शिर्डीच्या जागेवरुन नवा पेच, मातोश्रीवर खडाजंगी;बबनराव घोलप तातडीनं उद्धव ठाकरेंच्या भेटीला, काय घडलं?
विधान परिषद आमदार नरेंद्र दराडे यांनी शनिवारी सायंकाळी उशिरा येथे भेट देत आंदोलनकर्त्यांचे प्रशासनाशी बोलणे करून दिले. आरोपांनुसार चौकशी समिती नेमून त्याचा अहवाल महिनाभरात सादर केला जाणार असल्याचे पत्र निफाड गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी उपलब्ध करून दिल्यावर या तरुणांनी चौकशी होईपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed