• Mon. Nov 25th, 2024
    पुणेकरांसाठी Good News! गणेशोत्सवाला अजित पवारांकडून मोठं गिफ्ट, घेतला महत्वाचा निर्णय

    पुणे : गणेशोत्सव सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पोलीस मुख्यलाय इथे गणेश मंडळ कार्यकर्त्यांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तर गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या काही सूचनादेखील पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतल्या आहेत.

    या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पुणे शहराचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल देखील उपस्थित होते. तर विभागीय आयुक्त सौरव राव हे देखील या बैठकीला उपस्थित होते.

    चंद्रावर रोव्हरच्या समोर असं काही आलं की बदलावा लागला मार्ग, इस्रोने फोटोसह दिली महत्त्वाची माहिती
    या बैठकीत पुणे मेट्रो संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतीच सुरू झालेल्या पुणे मेट्रोला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात गणेशोत्सव काळात देशभरातून गणेशभक्त पुण्यात येत असतात. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मेट्रोच्या फेऱ्या आणि वेळ वाढवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. गणेश उत्सव पाहण्यासाठी पुण्यात भाविक मोठ्या संख्येने येतात.

    रात्री उशिरापर्यंत देखावे सुरू असतात. यामुळे या भाविकांच्या सोयीसाठी मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरू करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यानुसार, ५ व्या दिवसापासून १० व्या दिवसापर्यंत १२ वाजेपर्यंत मेट्रोची सेवा सुरू ठेवण्याच्या सूचना मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीदरम्यान दिली आहे. पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा सुरु झाल्यापासून मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या पुणेकरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अशात गणेशोत्सवात येणाऱ्या भक्तांची संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

    सना खान हत्याकांडात मोठे अपडेट्स, आरोपींची होणार नार्को टेस्ट; पोलिसांची न्यायालयात याचिका

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed