• Sat. Sep 21st, 2024
भाषण लांबलं, उपस्थितांचा धिंगाणा, भुजबळांवर भाषण आवरतं घेण्याची वेळ, बीडमध्ये काय घडलं?

बीड : आक्रमक भाषणांनी सभा गाजवणारे फर्डे वक्ते धनंजय मुंडे यांच्या होमपीचवर म्हणजेच बीडमध्ये राष्ट्रवादीच्या दादा गटाची सभा संपन्न झाली. या सभेत ज्येष्ठ नेते तथा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी थेट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाच टार्गेट केलं. तेलगी प्रकरणात माझ्यावर आरोप झाल्यानंतर माझा पाजीनामा घेतला गेला मग खैरनार यांनी आरोप केल्यानंतर आपण राजीनामा का दिला नाहीत, असा सवाल करून दादा कोंडके यांच्यासारखे डबल मिनिंग जोक करू नका, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. पवारांची नाशिकची सभा, कोल्हापूर-बीडमधील सभा, आंबेगावमध्ये न झालेली सभा, पवारांची काँग्रेसमधील हकालपट्टी ते खैरनार यांचे आरोप अशा विविध मुद्यांवरून भुजबळांनी मननुराद फटकेबाजी केली. त्यामुळे भुजबळांचं भाषण लांबल्याने उपस्थितांनी गोंधळ घालत आता भाषण थांबवा, अशी मागणी केली. त्यानंतर २ मिनिटांत त्यांनी आपलं भाषण आवरतं घेतलं.

‘सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची… अस्मितेची… सन्मानाची अन् दुष्काळ मिटवण्यासाठीची… असे घोषवाक्य वापरत मंत्री अजित पवार यांनी ही जाहीर सभा आयोजित केली होती. भव्यदिव्य रॅलीने अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे, मंत्र्यांचे बीडमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अभिवादन केले.

छगन भुजबळांचं भाषण लांबलं, बीडकरांचा संयम सुटला; गोंधळामुळे भाषण गुंडाळण्याची वेळ

व्यासपीठावर राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मारावबाबा आत्राम, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आमदार सतीश चव्हाण, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विक्रम काळे, आमदार अमोल मिटकरी, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार अमरसिंह पंडित, युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर, कल्याण आखाडे, बजरंग सोनावणे, आदी नेते उपस्थित होते.

Dhananjay Munde : बीड जिल्ह्याला शरद पवारांनी काय दिलं हा प्रश्नच, धनंजय मुंडे यांचा बीडच्या सभेतून थेट सवाल
आजचा प्रचंड जनसमुदाय बघता हे सिध्द होत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या पाठीशी आहे असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि माझ्या विरोधात बोलले जाते मग बारामतीचा मुद्दा आला की अजितदादा आमचे नेते आहेत असे बोलले जाते. जर तुम्हाला ते तुमचे नेते आहे असे वाटते तर मग ते पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत हे जाहीर करा, असा जोरदार टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.

यावेळी छगन भुजबळ यांनी पक्षात जे जे घडले त्याचा उहापोह सभेत केला. याशिवाय पहाटेला तुम्ही जायला सांगता आणि तुम्ही बोलता ती गुगली होती. अशी राजकारणात गुगली असते का? असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. छगन भुजबळ जेलमध्ये गेला पण बाहेर आल्यावर तुमच्यासोबत राहिला याची आठवण करून देतानाच तुम्हाला कॉंग्रेसमधून बाहेर काढले त्यावेळी मी तुमच्यासोबत होतो हेही आवर्जून छगन भुजबळ यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal:येवल्यातील सभा ते तेलगी प्रकरणात गृहमंत्रिपदाचा राजीनामा, छगन भुजबळांचे शरद पवारांना थेट सवाल
आम्ही विकासासाठी दादासोबत आलो. मग आमच्यावर हल्ले का करता? साहेब तुम्ही डबल मिनिंग शब्द कधी वापरायला लागलात. तुम्ही आम्हाला शिकवलं व्यक्तीगत कुणाविषयी बोलायचं नाही आणि तुम्हीच आज बोलत आहात असेही छगन भुजबळ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed