पारंपारिक शेतीला फाटा देऊन काही तरी नवीन प्रयोग करण्याचं रमेश ठोंबरे यांनी ठरवलं होते. स्वतः प्रगत शिल शेतकरी आहेत. वेगवेगळया फळ बागेसाठी त्यांना ओळखलं जात. मात्र, यंदा त्यांनी अगदी कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं मिळेल याकडे भर दिला.
२० ते २५ लाखांची अपेक्षा…
ठोंबरे यांची तांदळी वडगाव शिवारात वडिलोपार्जित जमीन असून, त्यांनी साडे तीन एकर क्षेत्रावर डाळिंब बाग लावली आहे. यासाठी त्यांना एकरी लाखावर रूपये खर्च आला. डाळिंब बागेतून आधी घेतल उत्पन्न हे बांगलादेश येथे विक्रीसाठी गेले. यावर्षी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी प्यायला पाणी नाही, तर शेतीला कसं उपलब्ध होणार, त्यात फळ बागा कश्या जगवाच्या हे खूप मोठं आव्हान होतं. त्यात फळावर जर कोणता रोग पडला तर तो रोग फळ बाधित करतो आणि त्यामुळे भाव कमी मिळतो. ठिपका पडलेलं डाळिंब बाजारात कोणी घेत नाही. त्यामुळे विशेष लक्ष देऊन फळ जपावे लागते.
याबाबत बोलतांना ठोंबरे म्हणाले की, जमीन खडकाळ असल्याने पाहिजे तसे उत्पादन निघत नव्हते. त्यामुळे वडिलांनी डाळिंब पीक घेण्याचं सुचवलं होतं. ज्यातून जमिनीवर डाळिंबाची लागवड केली. योग्य नियोजन केल्याने डाळिंबातून चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. मात्र, फळ बागासाठी योग्य मार्गदर्शन आणि भाव मिळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.