सुरुवातीला कांदा व्यापाऱ्याच विश्वास संपादन केला
फिर्यादी साजिद हुसेन अजमेरी यांचे भारत ओनियन नावाने सोलापूर मार्केट यार्डात कांद्याचे आडत व्यवसाय आहे.केरळातील नजीब हमजा अंचलन आणि फतेह हमजा अंचलन यांनी साजिद अजमेरी यांच्या कडून मोठ्या प्रमाणात कांदा घेतला. सुरुवातीला घेतलेल्या कांद्याची रक्कम वेळोवेळी दिली होती.यानंतर साजिद अजमेरी यांनी विश्वासाने केरळातील या दोघा व्यापाऱ्यांना २३ नोव्हेंबर २०१९ ते २० ऑक्टोबर २०२१ दरम्यान ४ कोटी ५५ लाख ९५ हजारांचा कांदा विक्री केला होता.या विश्वासाचा फायदा घेत केरळातील व्यापाऱ्यांनी सोलापुरातील कांदा व्यापाऱ्याची जबर फसवणूक केली आहे.
पैसे देण्यास टाळाटाळ,अखेर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सोलापुरातील कांदा व्यापारी साजिद हुसेन अजमेरी यांनी २०२१ पासून केरळातील मुबारक एजन्सी व मुबारक ट्रेडर्स या व्यापाऱ्यांकडे साडेचार कोटी रुपयांच्या कांद्याच्या रकमेची मागणी केली.केरळातील दोघां व्यापाऱ्यांनी कांद्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करत दोन वर्षे चालढकल केली.
कोट्यावधी रुपयांची रक्कमेची फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यावर २५ ऑगस्ट २०२३ रोजी सोलापुरातील कांदा व्यापारी साजिद हुसेन अजमेरी यांनी जेलरोड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.कोट्यवधी रुपयांची फसवणूक असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला आहे.अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे एपीआय डी.बी. काळे करत आहेत.