• Mon. Nov 25th, 2024
    गरोदर बहिणीला डॉक्टरकडे घेऊन जात होता; रस्त्यात रेड्याने दिली दुचाकीला धडक, अन्…

    सिंधुदुर्ग: जिल्ह्यात गव्या रेड्यांचा रस्त्यावर वावर वाढत आहेत. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मारण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. अनेक लोक जखमी झाले आहेत. तर गव्यांच्या धडकेत काही लोक मृत्युमुखी पडले आहे. मानवी वस्तीत गव्यांचा वावर वाढल्यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली वावरू लागले आहेत.
    दुचाकी आणि कारमध्ये धडक, मोटारसायकलस्वाराचा जागीच करुण अंत, परिसरात हळहळदरम्यान आता याच गव्या रेड्यांमुळे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीने घरी परतत असताना गवा रेड्याने धडक दिल्यामुळे साटेली तर्फ सातार्डा येथील दोघे भाऊ बहीण जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास माजगाव भाईसाहेब सावंत समाधी समोर घडली. लावण्या मेस्त्री (रा. तळवडे ) आणि प्रसाद नाईक (रा. साटेली तर्फ सातार्डा ) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    बीडमध्ये क्षीरसागर विरूद्ध क्षीरसागर, अजितदादांमुळे क्षीरसागर कुटुंबियांत आणखी एक फूट पडणार?

    मिळालेल्या माहितीनुसार, लावण्या ही गरोदर असल्यामुळे तिच्या उपचारासाठी भाऊ प्रसाद हा तिला घेऊन सावंतवाडीत डॉक्टरकडे आला होता. यावेळी माजगाव येथे दुचाकीने परतत असताना अचानक रस्त्यावर आडव्या आलेल्या गव्याने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोघेही रस्त्यावर पडले. तर यावेळी गव्याने प्रसाद यांच्या पोटावर पाय ठेवला अशा परिस्थितीतही प्रसादने उठून आपल्या बहिणीला बाजूला केले. हा प्रकार पाहताच तिथून जाणाऱ्या माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांच्यासह बंटी शेख गुरु वारंग, नरेंद्र बोंद्रे,अवी पडते आदी युवकांनी त्यांना तात्काळ हरिश्चंद्र पाटकर यांच्या रिक्षात घालून सावंतवाडी कुटीर रूग्णालयात दाखल केले. सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed