• Sun. Mar 8th, 2026
    VIDEO | बाबा, माझी CRPF मध्ये निवड; एसटी कंडक्टरला धावत्या बसमध्येच फोन, प्रवाशांना पेढे वाटले

    सांगली : शिराळा-मुंबई एसटी बस कंडक्टरला ड्युटीवर असतानाच फोन आला. मुलाची सीआरपीएफमध्ये निवड झाल्याचं त्याला फोनवर समजलं. ही गोड बातमी ऐकून कंडक्टरचा आनंद गगनात मावेनासा झाला. ही गूड न्यूज त्याने आपल्यापुरती न ठेवता बेल मारुन बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना पेढे वाटले. आपल्या मुलाचा अभिमान बाळगणाऱ्या पित्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे

    शिराळा आगाराची बस (क्रमांक एमएच १४ बी टी ३४२३) ही मुंबईला निघाली होती. कोणत्याही मुलाला हे माझे वडील आहेत असा अभिमान वाटावा असा प्रसंग यावेळी प्रवासादरम्यान घडला.

    तेजस ठाकरेंनी सापाची नवी प्रजाती शोधली, नाव वाचून ‘सह्याद्रीची छाती’ अभिमानाने फुलेल
    या गाडीचे वाहक नंदकुमार ढेबे (रा. वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) यांना त्यांचा मुलगा शुभम याचा फोन आला. त्याची सीआरपीएफमध्ये निवड झाली असल्याचं त्याने बाबांना सांगितलं. वडील आपल्या कर्तव्यावर होते. त्यांनी एका दुकानाजवळ बसला बेल दिली. पटकन खाली गेले आणि पेढ्याचे दोन मोठे बॉक्स घेऊन आले.

    पोलीस पत्नीला ड्युटीवरुन आणलं, मोठ्या मुलीला शाळेत सोडलं; जिथे ‘हृदय’, तिथेच नवऱ्याने दोघींना संपवलं
    गाडीतील प्रत्येक प्रवाशाला त्यांनी पेढा दिला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून प्रवाशांनीही शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या आनंदात सहभागी झाले. निश्चितच शुभमही या कष्टाची आयुष्यभर जाणीव ठेवून प्रामाणिक आणि तत्पर सेवा आपल्या वडिलांप्रमाणे बजावेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *