म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शहरात दिवसाला सरासरी दोन गंभीर स्वरुपाचे अपघात होत असताना हेल्मेटधारकांची संख्या वाढल्याची सकारात्मक बाब आहे. सात महिन्यांत ११३ अपघातांत १२२ चालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये हेल्मेट नसल्याने मृत झालेल्यांची संख्या १७ आहे. तर, वेगाने वाहन चालविल्याने सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. अतिवेगामुळे अपघाताचा ‘काळ’ ओढावत असल्याचे चालकांनी विचारात घ्यायला हवे, अशी सूचना पोलिसांनी केली आहे.
भरधाव दुचाकी घसरून जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. म्हसरूळ गावाजवळ ही घटना घडली. रवींद्र संतू लोखंडे (वय ४४, रा. ओमकार प्लाझा, उपनगर) असे मृताचे नाव आहे. ‘एमएच १५ जेजे ८७०६’ क्रमांकाच्या दुचाकीवरून पंचवटीकडे येत असताना हा अपघात झाला. दरम्यान, या स्वरुपाचे सात महिन्यांत ४४ अपघात झाले असून, त्यामध्ये ४६ चालकांचा मृत्यू झाला आहे. तर, विविध कारणांतून सात महिन्यांत २८८ अपघात झाल्याची नोंद वाहतूक पोलिसांनी केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक १३० अपघात अतिवेगाने वाहने चालविल्याने झाले आहेत. त्यापाठोपाठ ११४ अपघात हे धोकादायकरित्या वाहने चालविणे, २० अपघात विनाहेल्मेट वाहनचालकांचे झाले आहे. तर, ड्रंक अँड ड्राइव्हचे केवळ दोन अपघात झाल्याची नोंद आहे.

७४० जणांचा मृत्यू
नाशिक शहरात गत चार वर्षांत रस्ते अपघातांमध्ये ७४० वाहनचालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये दुचाकीस्वारांसह कारमधील प्रवाशांचाही सहभाग आहे. त्यानुसार सन २०१९ मध्ये १६९ अपघातात १७७, २०२० मध्ये १६२ अपघातांत १७१, २०२१ मध्ये १७६ अपघातांत १८५ आणि सन २०२२ मध्ये १८९ अपघातांत २०७ वाहनचालकांचा नाशिक शहरात मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे चालकांनी रस्ता सुरक्षेबाबत अधिक जागरूक राहण्याची अपेक्षा वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली आहे.
कारणे : मृत : गंभीर जखमी : किरकोळ
हायस्पीड : ४६ : ९९ : ४३
रॅश ड्रायव्हिंग : ४८ : ८० : २६
विनाहेल्मेट : १७ : ९ : २
ड्रंक अँड ड्राइव्ह : – : २ : १
राँग साइड : ४ : १० : –
लेन कटिंग : – : २ : –
इतर कारणे : ७ : ९ : –