• Sat. Sep 21st, 2024
राज्यात ‘या’ जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिरात ड्रेसकोड लागू; दर्शनाला जाताना घ्यावी लागेल काळजी

सिंधुदुर्ग: दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख असलेलं श्री देव कुणकेश्वर मंदिर परिसरात श्रावणी सोमवारपासून वस्त्रसंहिता नियमावली लागू करण्यात आली आहे. कुणकेश्वरांच दर्शन घेण्यासाठी रत्नागिरी, मुबई ,कोल्हापूर, सांगली, कर्नाटक, बेळगाव या भागातून हजारो भाविक येत असतात.
भाविकांनो काळजी घ्या; अधिक मासाच्या गर्दीचा फायदा, तुळजाभवानी मंदिरात भक्तांचे खिसे कापले
भारतीय हिंदू संस्कृतीचे पालन होण्यासाठी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टने हा नियम लागू केला आहे. याबाबतची जनजागृती मंदिर परिसरात भित्तीपत्रकाद्वारे करण्यात आली आहे. श्री देव कुणकेश्वर मंदिर परिसरात देवालयामध्ये प्रवेश करण्यासाठी सर्व भाविकांना वस्त्रसंहिता नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे असभ्य, अशोभनीय आणि तोकडे कपडे तसेच फाटलेल्या जीन्स पँट अशा प्रकारचे कपडे परिधान करून दर्शन घेता येणार नाही. भाविकांनी याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्यावतीने अध्यक्ष संतोष लब्दे यांनी केले आहे.

जिवंत नागाच्या पूजेसाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या शिराळ्यात प्रतिकात्मक नागपूजा

तसेच जर अनावधानाने असा कोणी भाविक दर्शनासाठी दाखल झाल्यास तो दर्शनापासून वंचित राहू नये, यासाठी देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने ओढणी, लुंगी, पंचाई आदी वस्त्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष लब्दे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed