• Sat. Sep 21st, 2024

सिंधुदुर्गमध्ये ठाकरे गटाला धक्का, कुणी केला जय महाराष्ट्र, एकनाथ शिंदेंकडे इनकमिंग सुरुच

सिंधुदुर्गमध्ये ठाकरे गटाला धक्का, कुणी केला जय महाराष्ट्र, एकनाथ शिंदेंकडे इनकमिंग सुरुच

अनंत पाताडे, सिंधुदुर्ग : शिवसेना पक्षात गेल्या वर्षी म्हणजेच जून २०२२ मध्ये फूट पडली. या पक्षात फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले आमदार पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर राष्ट्रपती निवडणुकीनंतर खासदारांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. पुढील काळात केंद्रीय निवडणूक आयोगानं ही शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. निवडणूक आयोगाचा हा निर्णय सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यानंतर आता स्थानिक पातळीवरील पदाधिकारी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडत असल्याचं चित्र आहे. देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष असलेल्या साक्षी प्रभू शिंदे गटात दाखल झाल्या आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिंदे गटाने जोरदार धक्का दिला आहे. हळूहळू ठाकरे गटाच्या शिवसेनेला गळती लागायला सुरुवात झाली आहे.अनेक ठिकाणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत त्यामुळे ठाकरे गटाला धक्के बसत आहेत.

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या साक्षी प्रभू यांनी भाजपाच्या प्रणाली माने यांचा ९ विरुध्द ८ मतांनी पराभव केला आणि नगराध्यक्षपदी साक्षी प्रभू विराजमान झाल्या होत्या.तर उपनगराध्यक्षपदाच्या निवडीमध्ये महाविकास आघाडीच्या मिताली सावंत यांनी भाजपाच्या अरुणा पाटकर यांचा ९ विरुध्द ८ मतांनी पराभव करत उपनगराध्यक्षपदी मिताली सावंत विराजमान झालेल्या आहेत.

आता ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष साक्षी प्रभू, नगरसेवक रोहन खेडेकर शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आज आला आहे.शिवसेना ठाकरे गटाला देवगड मध्ये जोरदार धक्का बसला असून, देवगड नगराध्यक्ष साक्षी प्रभू आणि नगरसेवक रोहन खेडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, संदेश पटेल आदी उपस्थित होते.
उच्चशिक्षित घरातील तरुण गायब झाला, रस्तोरस्ती फिरू लागला, पण सोशल मीडियाने जादू केली आणि…
सिंधुदुर्गात शिंदे गटाची ताकद वाढताना पाहायला मिळत आहे.त्यामुळे आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रोहितने कोहली साधला निशाणा, Asia Cup चा संघ जाहीर झाल्यावर नेमकं काय म्हणाला जाणून घ्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed