• Sat. Sep 21st, 2024

घरमालक आणि भाडेकरूंसाठी महत्त्वाची बातमी: आदेशाचे पालन न करणाऱ्यांना पोलिसांचा दणका

घरमालक आणि भाडेकरूंसाठी महत्त्वाची बातमी: आदेशाचे पालन न करणाऱ्यांना पोलिसांचा दणका

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : घरामध्ये ठेवलेल्या भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलिस ठाण्यास कळविणे बंधनकारक असताना, तळोजामधील दोन घरमालकांनी घरामध्ये परदेशी नागरिकांना भाडोत्री म्हणून ठेवून त्याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांना दिली नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तळोजा पोलिसांनी या दोन्ही घरमालकांसह एका एजंटविरोधात सरकारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या महिन्यातही पोलिसांनी दोन घरमालकांवर अशाच पद्धतीची कारवाई केली होती.

तळोजा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश काळदाते यांनी त्यांच्या हद्दीत बेकायदा भाडोत्री म्हणून राहात असलेल्या भाडेकरूंची माहिती प्राप्त करून त्यांना वास्तव्यास ठेवणाऱ्या घरमालकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी तळोजा फेज २ सेक्टर १७ मधील साई आनंद सोसायटीतील फ्लॅट नं. १०१ मध्ये जाऊन शोध घेतला असता, येथे युगांडा देशाचा ऍनेट ऍपीओ हा राहात होता. या परदेशी नागरिकासोबत घरमालक मोहम्मद शमशोद्दीन याने भाडेकरार केला आहे. मात्र, याबाबतची नोंद तळोजा पोलिस ठाण्यात केली नसल्याचे आढळून आले. तसेच, ही खोली भाड्याने देणारा एजंट युसुफ रोजन शेख यानेसुद्धा या परदेशी भाडेकरूची माहिती पोलिस ठाण्याला दिली नसल्याचे आढळून आले.

६० हजारांची नोकरी सोडली, पेरु शेतीतून करतोय १० लाखांची कमाई

पोलिसांनी तळोजा फेज १ सेक्टर ५मधील ‘सिल्वर होम्स’ या इमारतीतील फ्लॅटचा मालक सलमान डाऊलकर (४०) यानेही मालकीच्या फ्लॅटमध्ये आयशा उमर या नायझेरीयन महिलेला भाडेकरू म्हणून ठेवले होते. याचीही माहिती त्याने पोलिसांना दिली नव्हती. या दोन्ही प्रकरणांतील घरमालकांनी व एजंटवर सरकारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed