• Mon. Nov 25th, 2024

    मुंबई पुणे रेल्वे प्रवास वेगवान होणार, स्वयंचलित सिग्नलिंगचं काम पूर्ण, ब्लॉक सक्सेसफुल

    मुंबई पुणे रेल्वे प्रवास वेगवान होणार, स्वयंचलित सिग्नलिंगचं काम पूर्ण, ब्लॉक सक्सेसफुल

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे रेल्वे विभागातील पुणे ते लोणावळा मार्गावरील चिंचवड-खडकी दरम्यानचे १०.१८ किलोमीटर स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम रेल्वे प्रशासनाने रविवारी पूर्ण केले. त्यामुळे आता या मार्गावरील ५४ किलोमीटरचे स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम पूर्ण झाल्यामुळे या मार्गावर रेल्वेचा वेग वाढणार आहे. येत्या तीन महिन्यात खडकी ते शिवाजीनगर अशा उर्वरित ६.२४ किलोमीटरच्या स्वयंचलित सिग्नलिंगचे काम पूर्ण केले जाणार आहे.

    पुणे रेल्वे विभागातील पुणे ते लोणावळा दरम्यान ६०.५९ किलोमीटर स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम केले जाणार आहे. त्यापैकी लोणावळापासून चिंचवडपर्यंत ४८ किलोमीटरच्या मार्गावर स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्याचे काम २०२० मध्ये पूर्ण झाले. त्यामुळे प्रवाशांना न थांबता प्रवास करता येत होता. पण, नंतर चिंचवड ते शिवाजीनगर मार्गाचे सन २०२० पासून काम प्रलंबित होते. प्रत्येक वर्षी चिंचवड ते शिवाजीनगर मार्गाच्या स्वयंचलित सिग्नल यंत्रणाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
    दुसऱ्या टी-२० सामन्यात बुमराने एकही बदल का केला नाही, जाणून घ्या काय होतं सर्वात मोठं कारण
    गेल्या काही महिन्यांपासून चिंचवड ते खडकीचे स्वयंचलित सिग्नलिंगच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाने या कामाच्या पूर्णत्वासाठी रविवारी ब्लॉक घेतला होता. त्यानुसार रविवारी चिंचवड ते खडकी मार्गावरील १०.१८ किलोमीटरच्या स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम पूर्ण केले. चिंचवड ते खडकीपर्यंत स्वयंचलित सिग्नल यंत्रणा सुरू केल्यास रेल्वेचा वेग वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.

    येत्या तीन महिन्यात पुढील टप्प्यात खडकी ते शिवाजीनगर या रेल्वे मार्गावर स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविली जाणार आहे. रविवारी स्वयंचलित सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी घेतलेला ब्लॉक यशस्वी झाला, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
    छगन भुजबळ भाजपची अडचण वाढवणार? ब्राह्मण समाज अन् भिडेंबाबत गदारोळ होताच आता पुन्हा म्हणाले…
    पुणे रेल्वे विभागातील चिंचवड ते खडकी दरम्यान वाहतूक व सिंग्नलिंगच्या कामासाठी घेण्यात आलेल्या ब्लॉक मुळे डेक्कन एक्सप्रेस, प्रगती, कोयना एक्स्प्रेसह पुणे लोणावळा दरम्यानच्या लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. आता उर्वरित सिग्नलिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

    Sharad Pawar: ईडीच्या भीतीनं सहकाऱ्यांनी वाट बदलली, भेकड प्रवृत्तीला लोक जागा दाखवतील, शरद पवारांचा हल्लाबोल

    विहिरीनं तळ गाठला, वीजेअभावी पिकं करपली ; दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *