• Sat. Sep 21st, 2024
प्रणिती शिंदेंच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा तुफान राडा; फोटो काढण्यावरून भिडले!

सोलापूर: सोलापूर शहरातील काँग्रेस भवनात काँग्रेस कार्यकर्ते फोटो काढण्याच्या कारणावरून एकमेकांना शिवीगाळ करत भिडल्याची घटना घडली. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचं चित्र समोर आलं आहे. काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यासाठी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व पदाधिकारी काँग्रेस भवनात एकत्रित जमले होते. आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राजीव गांधीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रणिती शिंदेंनी मार्गदर्शनपर भाषण केले आणि काँग्रेस भवनातून त्या निघाल्या. मात्र यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी शिंदे यांच्यासोबत फोटो काढण्यावरून बाचाबाची करू लागले. ही बाचाबाची नंतर हाणामारीत परावर्तीत झाली.

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अधिक माहिती घेतली असता, कार्यकर्त्यांमध्ये फोटो काढण्यावरून शाब्दिक चकमक झाली होती. काँग्रेस पदाधिकारी सुशील बंदपट्टे यांचे कार्यकर्ते हे प्रणिती शिंदेंसोबत फोटो काढण्यासाठी धावपळ करत होते. त्यानंतर पक्षाचे आणखी एक कार्यकर्ते महेश वाघमारे यांनी बाजूला व्हा, दुसऱ्यांना फोटो काढायचे आहे, असे सांगितले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि नंतर हे प्रकरण एकमेकांवर धावून जाण्यापर्यंत गेले आणि हाणामारीपर्यंत वाद विकोपाला गेला.

Sharad Pawar: ईडीच्या भीतीनं सहकाऱ्यांनी वाट बदलली, भेकड प्रवृत्तीला लोक जागा दाखवतील, शरद पवारांचा हल्लाबोल

शहराध्यक्षकांनी सायंकाळी प्रकरण मिटवले

काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सुशील बंदपट्टे व महेश वाघमारे या दोघांना काँग्रेस भवनात बोलावून वाद मिटवला. चेतन नरोटे यांनी माहिती देताना सांगितले, काँग्रेस भवन हे एक मंदिर आहे, यापुढे असे होणार नाही, याबाबतची समज वाद करणाऱ्यांना देण्यात आली आहे. गैरसमजातून हा प्रकार घडला असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed