• Sun. Sep 22nd, 2024
‘पोटासाठी नाचते मी परवा कुणाची?’ ,मंगला बनसोडे यांच्या गाण्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी महाराष्ट्राची लोककला खऱ्या अर्थाने जिवंत तमाशा कलावंतांनी ठेवली, असं म्हटलं. अनेक अडचणींवर मात करत आजही ही लोककला अनेकांनी जोपासली आहे. करोना कालावधी नंतर उपासमारीची वेळ या कलावंतांवर आली. सध्या डीजेच्या तलवार होणाऱ्या शो मुळे अनेकांनी तमाशाकडे पाठ फिरवली, असं मंगला बनसोडे म्हणाल्या. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची हे गाणे बनसोडे यांनी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील पहिल्या शाहिरी लोककला संमेलनात सादर करताच उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले. संमेलनातील संपूर्ण वातावरण यावेळी भावनिक झाले होते. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, लोकशाहीर अमरशेख आणि लोककवी वामनदादा कर्डक यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी शाहिरी लोककला संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं.

ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी करोना सारख्या महामारीनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील हातावरील पोट असणारी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असल्याचं सांगितलं. त्यातच तमाशा कलावंतांची अवस्था अतिशय दयनीय झाली. कोणी मदत केली नाही, उपचारासाठी पैसे नाहीत अशा अनेक अडचणींमध्ये अनेक कलाकार मृत्युमुखी पडले. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आणि पुन्हा जगण्याची लढाई सुरू झाली, असं त्या म्हणाल्या. लावणी शो, डीजेच्या तलवार अश्लील नृत्य करणाऱ्या नृत्यांगना यांच्यामुळे महाराष्ट्राची लोककला टिकवून ठेवलेल्या तमाशाला अद्यापही चांगले दिवस आलेले नाहीत, असं त्या म्हणाल्या.
फेसबुकवर मैत्री, नंतर नोकरीचं आमिष; तरुणीने विश्वास टाकला आणि नंतर घडली धक्कादायक घटना!
सांगली जिल्ह्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव जन्मगावी लोककलावंतांचे पाहिले शाहिरी लोककला संमेलन आज संपन्न झाले. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांच्या हस्ते झाले. यावेळी लोककलावंतांची व्यथा मांडणारे “पोटासाठी नाचते मी परवा कुणाची” हे गाणं सादर केल्यानंतर उपस्थित मान्यवरांसह अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरंगले होते. यासंमेलानासाठी पुरोगामी संघटनेचे डॉ. भारत पाटणकर, शीतल साठे, सचिन माळी, बीआरएसचे नेते रघुनाथ पाटील उपस्थित होते.

Chandrayaan 3 : भारताचं चांद्रयान ३ चंद्रावर कधी उतरणार, इस्त्रोनं तारीख अन् वेळ सांगितली, जाणून घ्या अपडेट

डीजे गाणी आणि शो मुळे तमाशा अडचणीत : मंगला बनसोडे

सध्या आलेल्या डीजे गाण्यांमुळे आणि त्यातून होणाऱ्या तरुणींच्या शो मुळे प्रेक्षकांनी लावणी आणि तमाशा या लोककलेकडे पाठ फिरवली असल्याचे मत मंगला बनसोडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. सध्या यात्रा, जत्रा मधून तमाशा जिवंत आहे. मायबाप प्रेक्षकाने तमाशा कलावंतांच्या पाठीशी उभे राहावे, असं त्यांनी म्हटलं. राज्य शासनाने बंद केलेलं वार्षिक अनुदान सुरू करावे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ सुरू करावे, असं त्या म्हणाल्या.

काँग्रेसच्या वर्किंग कमिटीतून बाळासाहेब थोरातांना वगळलं; ‘या’ कारणामुळे पक्षाकडून पत्ता कट?

पाणी द्या, नाही तर कर्नाटकमध्ये जाण्यास परवानगी द्या; दुष्काळग्रस्तांची सरकारकडे मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed