• Sat. Sep 21st, 2024

दुष्काळी संकट दारावर; पावसाअभावी बीड जिल्ह्यात खरीप क्षेत्र अडचणीत

दुष्काळी संकट दारावर; पावसाअभावी बीड जिल्ह्यात खरीप क्षेत्र अडचणीत

म. टा. प्रतिनिधी, बीड : जिल्ह्यात यावर्षी आठ लाखाच्या जवळपास क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे. मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दडी मारल्याने हे आठ लाखाच्या जवळपास खरीप क्षेत्र अडचणीत आले आहे. पाऊस नसल्याने पिकाची वाढ खुंटलेली असून हलक्या रानावर पिके आता माना टाकू लागलेली आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील १४३ प्रकल्पांतील पाणीसाठा तळाला गेला असून उपलब्ध पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलेला आहे. एकूणच या आठवड्यात पाऊस न झाल्याने जिल्ह्यासमोरील दुष्काळी समस्या आ असून उभी टाकणार आहे.

जिल्ह्यात खरीपासाठी शेतकऱ्यांनी मोठी तयारी केली होती. नांगरण, डोंगरण केले. बीभरणाची व्यवस्था लावली. खरीप पिकांच्या भरवशावर पुढील आर्थिक गणिते मांडली होती, बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात पुन्हा पावसाने हुलकावणी दिली. सुरूवातीला जून महिन्यात पावसाने अवकृपा केली. जुलैमध्ये पेरणीसाठी पाऊस झाला तेवढया पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी उरकली त्यानंतर मात्र तो गायब झाला. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. पावसाचा मोठा पडलेला खंड खरीप पिकांच्या मुळावर आला आहे. जिल्ह्यात आठ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली. हे खरीप क्षेत्र ऐन पीक वाढीच्या अवस्थेत पावसाने खंड दिल्याने अडचणीत आले आहे. कापूस, तूर, सोयाबीन, मूग ,उडीद, मका पिके पावसापाण्याअभावी सुकत आहेत.

जिल्ह्यात पावसाळ्याचे तीन महिने संपत येत असताना केवळ २४८ मिलीमीटर म्हणजेच केवळ ४३ टक्के पाऊस पडला आहे. या कमी पर्जन्यमानामुळे या भागातील पिकांच्या उत्पादनात घट येणार असल्याचा अंदाज कृषि विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्याची पावसाची सरासरी ५६६ मिलीमीटर असताना केवळ २४८ मिलीमीटर पाऊस झालेला आहे. त्यामुळे उडीद, मूग, सोयाबीन, कापसासह अन्य पिकांची स्थिति बिकट आहे.
पावसाने आणले बळीराजाच्या डोळ्यांत पाणी; फुलंब्रीत हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात
बीड जिल्ह्यात पावसाने मोठा पंधरा दिवसांहून अधिक खंड घेतल्याने पिके धोक्यात आहेत. आगामी काही दिवसांत पाऊस न पडल्यास सरकारने पंचनामे करावेत. -नमिता मुंदडा, आमदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed