मराठवाडा आणि विदर्भात पुढील ३,४ तासांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या विभागांमध्ये काही ठिकाणी मधूनमधून तीव्र सरी पडण्याची शक्यता आहे. या परिसरात गेल्या अनेक दिवासांपासून पावसाची प्रतीक्षा आहे. पुणे आयएमडीचे प्रमुख डॉ. के.एस. होसाळीकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भासाठी ही बातमी दिलासादायक आहे.
मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट
शुक्रवारी भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून राज्यात पुढील चार दिवसांमध्ये पावसाची स्थिती कशी असेल यासंदर्भात इशारे जारी करण्यात आले. १८ ऑगस्टला विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. तर विदर्भातील उर्वरित जिल्हे आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांसह जळगावला यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानंतर आजही या मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
