• Sat. Sep 21st, 2024

उद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा, १६ मतदारसंघाच्या आढावा बैठकांचं प्लॅनिंग ठरलं, यादी समोर

उद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा, १६ मतदारसंघाच्या आढावा बैठकांचं प्लॅनिंग ठरलं, यादी समोर

मुंबई : महाराष्ट्रात देशातील २६ राजकीय पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होणार आहे. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ३२ लोकसभा मतदारसंघांचा आढावा उद्यापर्यंत पूर्ण होणार आहे. उद्धव ठाकरे उद्या सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतील. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उर्वरित १६ मतदारसंघांच्या आढाव्याचा दुसरा टप्पा २२ ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या टप्यातील लोकसभा मतदारसंघांच्या आढावा बैठकांचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. दुसऱ्या टप्यातील १६ लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठका मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये होणार आहेत. दुसऱ्या टप्यात मराठवाडा आणि विदर्भाचा आढावा २२ ते २६ ऑगस्ट दरम्यान ठाकरेंकडून घेतला जाणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसनेचे १८ खासदार विजयी झाले होते. त्यामुळं पक्षातील फुटीनंतर होणारी पहिली लोकसभा ठाकरेंसाठी महत्त्वाची आहे. १८ पैकी १३ खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं उद्धव ठाकरे त्या खासदारांना धडा शिकवण्यासाठी नियोजन करण्याची शक्यता आहे.
भारताने उडवली आयर्लंडची दाणादाण, बुमराने कमबॅक करत पहिल्या सामन्यात रचला विजयाचा पाया
बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा – गोंदिया, गडचिरोली – चिमूर, चंद्रपूर, जालना, संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा या मतदार संघाचा आढावा घेतला जाणार आहे.

कसा असणार दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा बैठकीचा कार्यक्रम –
चांद्रयान-३ मोहिमेवर ५ मोठे अपडेट; पाठवला पहिला व्हिडिओ, सॉफ्ट लँडिंगच्या आधी समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया
२२ ऑगस्ट
दुपारी साडे बारा – बुलढाणा
दुपारी ३ – अकोला
दुपारी ४ – अमरावती
दुपारी ५ – वर्धा

२००९ ला लोकसभेचं मैदान मारलं, सगळ्या पक्षात हवा केली, आता घरवापसी भाऊ ठाकरेंसाठी लढणार!

१३ ऑगस्ट
दुपारी साडे १२- रामटेक
दुपारी ३ – नागपूर
दुपारी ४ – भंडारा- गोंदिया
दुपारी ५ – गडचिरोली चिमूर

२४ ऑगस्ट
दुपारी साडे १२- चंद्रपूर
दुपारी ३ -जालना
दुपारी ४ – संभाजीनगर
दुपारी ५- बीड

२५ ऑगस्ट
दुपारी साडे १२- धाराशिव
दुपारी ३ -लातूर
दुपारी ४ -सोलापूर
दुपारी ५ -माढा

राज्यात पाऊस कधी परतणार? IMD कडून यलो अलर्ट जारी, विदर्भ मराठवाड्यासह कोकणाला दिलासा मिळणार, जाणून घ्या अपडेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed