• Sat. Sep 21st, 2024

वंजाऱ्याचा पोरगा बीडच्या लढाईत खांद्याला खांदा लावून लढेन, क्षीरसागरांना दहा हत्तीचं बळ

वंजाऱ्याचा पोरगा बीडच्या लढाईत खांद्याला खांदा लावून लढेन, क्षीरसागरांना दहा हत्तीचं बळ

बीड : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर नाशिकपाठोपाठ ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बीडमध्ये सभा घेऊन अजितदादांचे सोबती धनंजय मुंडे यांच्याविरोधात एल्गार केला. यावेळी परळीत सत्तेचा गैरवापर सुरू आहे, अशी सत्ता उलथवून टाकण्यासाठी लोक तयार होत असतात, असा इशारा बबन गीत्ते यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पवारांनी धनंजय मुंडे यांना दिला. तत्पूर्वी केलेल्या भाषणात नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार भाषण ठोकलं. संदीप, तुझी आजी आज आकाशातून आनंदाने बघत असेल, माझा नातू जिल्ह्याचा नेता झाला, असं आव्हाड म्हणाले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “जे गेले ते बरंच झालं. कभी कभी सैलाब आता है और सबकुछ बदल देता है… तसाच सैलाब आताही आला आणि आमचा संदीप क्षीरसागर जिल्ह्याचा नेता झाला. नाहीतरी तो तरी कधी नेता म्हणून पुढे आला असता? चांगल्या चांगल्यांना आपण आजपर्यंत छातीवर घेतले आहे. आले अंगावर घेतले शिंगावर हा शरद पवारांचा नियम आहे. आणि आपण सर्व त्यांचे चेले आहोत. डरेंगे नाही तर लढेंगे. हा सगळा धनशक्ती विरोधात जनशक्तीचा मेळावा आहे”.

अमरसिंह पंडितांनी वय काढलं, पवार म्हणाले, ज्याच्याकडून सगळं घेतलं, त्याबद्दल थोडीतरी माणुसकी ठेवा…!
संदीप तुझी आजी आज आकाशातून , प्रेमाने आनंदाने बघत असेल

“साहेबांचाच फोटो वापरायचा, आणि साहेबाच्यांच नावाने दिशाभूल करायची, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादा गटाला लक्ष्य केले. अरे संदीप तुझी आजी आज आकाशातून , प्रेमाने आनंदाने बघत असेल- माझा नातू जिल्ह्याचा नेता झाला. कारण मला तुझ्याकडे बघून ही अपेक्षा नव्हती. पण तो खात्रीने सांगायचा की, साहेब, तुम्ही येऊन बघा, मी जिल्ह्यात काय करतोय ते… आणि तोच संदीप राष्ट्रवादीच्या फुटीत पवारसाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिला…!”

मोदी-शहांची अडीच वाजता बैठक, शिंदे गट-भाजपात वाद, दोन CM फोनवर, उमेदवारांची पहिली यादी तयार
हा वंजाऱ्याचा पोरगा बीडच्या लढाईत तुझ्या खांद्याला खांदा लावून लढेन,

“हा भगवानबाबाचा, वंजारीसमाजाचा पोरगा तुला शब्द देतो की, बीडच्या लढाईत तुझ्या खांद्याला खांदा लावून लढेन. बबन गिते, शंकर बांगर आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहेत. हा बीड जिल्हा आपण पुन्हा हलवून टाकू हा साहेबांना शब्द देतो. साहेबांना डिस्टर्ब करण्यासाठी, त्यांची राष्ट्रीय प्रतिमा मलीन करण्यासाठी केले जात आहे”, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

सबके लिए एक, एक के लिए सब! एकत्र मिळूनच भाजपला भिडायचं, उद्धव ठाकरेंचा मातोश्रीच्या बैठकीत प्लॅन
केशरकाकूंप्रमाणे संदीपने भूमिका घेतली

ज्या महाराष्ट्राचे नेतृत्व करत होतो आणि पक्षात वेगळी भूमिका मांडली जात होती; त्या वेळी बीड जिल्ह्याचे नेतृत्व केशरकाकूंकडे होते आणि त्यांनी विचारांशी तडजोड करणार नसल्याची भूमिका घेतली; तीच भूमिका त्यांचा नातू संदीपने घेतली आहे, असं पवार म्हणाले.

मी पुन्हा येईन म्हणणारे आले पण खालच्या रँकला आले, पंतप्रधान कुठल्या रँकला येणार?; शरद पवारांचा टोला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed