• Sat. Sep 21st, 2024

एसटीने प्रवास करताय, तिकीटासाठी सुट्टे पैसे नाहीत? चिंता नको, गुगल पे करा

एसटीने प्रवास करताय, तिकीटासाठी सुट्टे पैसे नाहीत? चिंता नको, गुगल पे करा

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: एसटी बसमधून प्रवास करताना, आता चिल्लर पैसे ठेवण्याची गरज पडणार नाही. एसटीने कंडक्टरांच्या हातात अँड्रॉइड तिकिट मशिन दिले आहे. आगामी काही दिवसात या मशिनवर गुगल पे किंवा फोन पे द्वारे बस प्रवासाचे तिकीट घेणे सोपे होणार आहे. या ऑनलाईन तिकीट विक्रीमुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांची चिल्लर ठेवण्याच्या कटकटीतून काही प्रमाणात सुटका मिळणार आहे. एसटीने विभागाला एक हजाराच्या वर मशिन दिलेल्या आहेत.

मध्यवर्ती बस स्थानकात विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्या हस्ते नाशिक मार्गावर जाणाऱ्या दोन कंडक्टरांना एसटीची नवीन अँड्रॉइड तिकिट मशिन देण्यात आली आहे. या मशिनपुर्वी असलेल्या ट्रायमॅक्स या कंपनीच्या मशिनला वेळोवेळी चार्जिंग मोठा प्रश्न येत होता. अनेक मार्गांवर पुन्हा कागदी तिकीटावर प्रवासी वाहतूक करण्याची वेळ आली होती. याशिवाय या मशिनचा त्रासामुळे कंडक्टरांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

याबाबत एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून; तसेच अधिकाऱ्यांनी एसटी महामंडळाच्या मुख्यालयाला तक्रारी केल्या होत्या. आता नवीन कंपनीच्या माध्यमातून एसटीच्या कंडक्टरांना नवीन अँड्रॉइड तिकिट मशिन देण्यात येत आहे. मध्यवर्ती बसस्थानकात एकूण २०० मशिन पाठविण्यात आली आहेत. यातील दोन दिवसांत चार मशिन संबंधित कंडक्टरांना देण्यात आली आहेत. या नवीन मशिनच्या माध्यमातून आता एसटी कर्मचाऱ्यांना बॅटरीचाही त्रास कमी होणार आहे. याशिवाय आगामी काही दिवसांत या मशिनवर ऑनलाइन पेमेंटची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे.

प्रवाशांसाठी खूशखबर: एसटीची राज्यातील पहिली खास स्लीपर बस तयार; ही आहेत वैशिष्ट्ये

चिल्लरची कटकट होणार कमी

एसटीच्या कर्मचाऱ्यांना अनेकदा चिल्लरचा त्रास सहन करावा लागत आहे. एसटीच्या पथकाने तिकीट तपासणी दरम्यान एसटी कर्मचाऱ्याकडे चिल्लर जास्त आढळल्यास, त्यांच्यावर कारवाई करण्याचे अनेक प्रसंग झालेले आहे. आता ऑनलाइन पेमेंटचा अनेक जण वापर करीत असतात. यामुळे ऑनलाइन पेमेंटमुळे चिल्लरची कटकट कमी होणार असल्याची माहिती एसटीच्या कंडक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

स्मार्ट सिटी बसमध्ये उपयोग

एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या अँड्रॉइड तिकिट मशिनचा प्रयोग शहर बस सेवेत स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन कडून करण्यात आला आहे. या मशिनचा वापर करणाऱ्यांना ही मशिन सोपी झालेली आहे. मोबाइलप्रमाणे हे मशिन असल्यामुळे याचा चांगला वापर होत आहे, अशीही माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

चालक नाही हा परमेश्वरच; प्रसंगावधान दाखवलं, जीव वाचवला, प्रवाशांकडून कौतुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed