• Sat. Sep 21st, 2024

मुलांना घडवणाऱ्या एकच गावच्या मुलगी आणि सुनेचा विशेष सन्मान….! गावकऱ्यांनी थेट चारचाकी दिली भेट

मुलांना घडवणाऱ्या एकच गावच्या मुलगी आणि सुनेचा विशेष सन्मान….! गावकऱ्यांनी थेट चारचाकी दिली भेट

शिरूर : मुलांच्या जडण घडणीमध्ये एका शिक्षकाचा खूप मोठा वाटा असतो. त्याचा प्रत्यय अनेकदा आपल्या सर्वांना येतो. मात्र शिरूर तालुक्यात शिष्यवृत्ती विद्यार्थी घडविण्यात शिरूर तालुक्यातील एकाच गावातील मुलगी आणि त्याच गावतील सुनेचा मोठा सहभाग आहे. शिरूर तालुक्यातील पिंपळे धुमाळ या या गावातील सून सुकन्या धुमाळ आणि मुलगी मेघा धुमाळ यांनी गावचे नाव एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. या दोन महिला शिक्षकांनी शिष्यवृत्तीत मुलांना घडवल्याने १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण गावाने या दोन्ही महिलांना चारचाकी भेट देत त्यांचा सन्मान केला आहे.

सुकन्या धुमाळ या गणेगाव खालसा या शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात. तर मेघा धुमाळ या कोयाळी पुनर्वसन या गावात शिक्षिका म्हणून काम करतात. सुकन्या यांनी त्यांच्या शाळेतील सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. तर मेघा धुमाळ यांचे ६१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. त्यातील मेघा यांनी १९ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.

या दोन्ही महिला शिक्षिका एकच गावच्या असून दोन्ही वेगवेगळ्या शाळेत असूनही त्यांचा ग्रामस्थांनी चार चाकी भेट देत सन्मान केला आहे. त्यामुळे पिंपळे धुमाळ गावची चर्चा आता होऊ लागली आहे. त्यांनी केलेल्या अध्यपणाचे विद्यार्थ्यांनी देखील चीज केले. त्यामुळे या दोन महिला शिक्षकांची चर्चा होऊ लागली आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर या दोन्ही शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. यामागे या महिला शिक्षिकांचे परिश्रम आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी चारचाकी सोबत इतर बक्षिसांचे देखील यावेळी यशस्वी शिक्षकांना वाटप करण्यात आले. मात्र या दोन महिला एकाच गावच्या असल्याने त्यांची विशेष चर्चा आता होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed