• Sat. Sep 21st, 2024

मनसेचं आजही खळखट्ट्याक, काल कंपनीचं कार्यालय आज मनसैनिकांनी टोलनाका फोडला

मनसेचं आजही  खळखट्ट्याक, काल कंपनीचं कार्यालय आज मनसैनिकांनी टोलनाका फोडला

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरे यानी शासनावर आसूड ओढताना चांद्रयान तीन चंद्रावर पाठवण्या ऐवजी महाराष्ट्रात पाठवायला हवे होते. चंद्रावरचे खड्डे पाहण्यापेक्षा मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे पाहा असा टोला लगावला होता. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत सध्या सगळीकडूनच मोठी टीका सुरू आहे. हे होत असताना गुरुवारी सायंकाळी उशिरा राजापूर-हातिवले येथील टोल नाका मनसैनिकांनी फोडला आहे. काही महिन्यांपूर्वी हा टोल नका सुरू करण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र, त्याला विरोध झाल्याने हा टोल नाका सुरू करण्यात आलेला नाही.

हातिवले टोलनाका तोडफोड प्रकरणी राजापूर मनसेचे राजापुर तालुकाप्रमुख पंकज पंगेरकर,उपतालुकाप्रमुख जयेंद्र कोठारकर पोलिसांच्या ताब्यात आहेत, अशी माहिती आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली आहे.

गणेशोत्सव आता अगदी काही दिवसांवर आला असताना सध्या मुंबई गोवा महामार्ग अक्षरश: चाळण झालेल्या स्थितीत आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात येण्याची लगबग सुरु असतानाही अद्यापही शासन आणि प्रशासन महामार्गाच्या दुरावस्थेकडे लक्ष देत नसल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या सैनिकांनी राजापूर – हातिवले येथील टोल नाक्याची तोडफोड करुन रोष व्यक्त केला.
आयर्लंडच्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल, जाणून घ्या कोणाला संधी मिळणार
गुरुवारी सायंकाळी पाच ते सहा च्या दरम्यान मनसैनिकांनी हातिवले येथील टोलनाक्याकडे आपला मोर्चा वळवला. या टोलनाक्यावरील केबिनची मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली असून केबिनच्या काचाही फोडल्या आहेत. मुंबई गोवा माहामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराची मनमानी आणि गेल्या १७ वर्षांपासून सुरु असणारे काम, यावर्षी देखील महामार्गाची झालेली चाळण यामुळे विविध संघटनांसह कोकणातील नागरिक रोष व्यक्त करत आहेत.
BJP : भाजप आणखी एका पुतण्यावर डाव लावणार, मुख्यमंत्री काकाला घेरणार, उमेदवारी जाहीर
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर काल मनसैनिकांनी रायगडमध्ये माणगाव येथील कंत्राटदाराच्या कंपनीत तोडफोड केली होती. यानंतर राज ठाकरे यांनी मनसैनिकांना रस्त्यावर खड्डे दिसल्यास तिथं झाड लावून आंदोलन करण्याचा सल्ला दिला होता. मनसैनिकांनी तोडफोड करु नये, असं आवाहन देखील त्यांनी केलं होतं.

उद्धव ठाकरेंचं लोकसभेसाठी प्लॅनिंग, नाशिक मतदारसंघाच्या बैठकीत मविआसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed