छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन घेतलेले दिसते. त्यांनी देखील फडणवीसांसारखे ‘मी पुन्हा येईन’ असे सांगितले. फडणवीस पुन्हा आले, पण खालच्या पदावर आहे, मोदी कोणत्या पदावर येतील हे आता सांगण्याची गरज नाही अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केली. पवार छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत, त्यांनी हॉटेल रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये पत्रकारांशी मनमोकळेपणाने संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, ‘आम्ही संघर्ष करु, मजबुतीने उभे राहू, जनमत तयार करु आणि त्यांना त्यांची जागा दाखवू. देशाची सत्ता आज ज्यांच्या हातात आहे त्या भाजपा आणि राज्यकर्त्यांची भूमिका समाजातील सर्व घटकांमध्ये कटुता कशी वाढेल अशी आहे. विरोधकांनी एकत्र येत ‘इंडिया’ ची स्थापना केली, त्याची बैठक बिहार आणि कर्नाटकात झाली. आता ३१ ऑगस्ट रोजी मुंबईत बैठक होत आहे आणि एक सप्टेंबर रोजी जाहीर सभा होणार आहे.’

पवार पुढे म्हणाले, ‘इथून पुढे आम्ही सामुदायिकपणे आणि एकत्रपणे केंद्र सरकारच्या विरोधात जनमत कसे तयार करु शकतो आणि या सरकारला कसा पर्याय देऊ शकतो विचार करु. केंद्र सरकारच्या अनेक निर्णयामुळे लोकांमध्ये कटुता वाढत आहे, सामाजित अंतर वाढत आहे. ‘इंडिया’ च्या बैठकीत हा मुद्दा आम्ही मांडणार आहोत. याचे गांभीर्य लक्षात आणून देऊ. ‘इंडिया’ मध्ये सहा राज्याचे मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांचा समावेश आहे. या सर्वांना त्यांच्या त्यांच्या राज्यात आक्रमक भूमिका घ्यायला लावू.’
अजित पवारांनी पुन्हा तुमच्या सोबत येण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना सोबत घेणार का असा प्रश्न शरद पवार यांना विचारला असता ते म्हणाले, त्या बद्दलचा निर्णय मी एकटा घेणार नाही, पक्ष निर्णय घेईल.