• Sat. Sep 21st, 2024

लव्ह जिहादचा आरोप करत तरुणाला बेदम मारहाण, मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेरील प्रकार

लव्ह जिहादचा आरोप करत तरुणाला बेदम मारहाण, मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेरील प्रकार

मुंबई : लव्ह जिहादचा दावा करत एक धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात एका मुस्लीम तरुणावर लव्ह जिहादचा आरोप करण्यात आला. इतक्यावरच न थांबता आरोपींनी या मुस्लीम तरुणाला मारहाण केली. हा मुस्लीम तरुण हिंदू मुलीसोबत फिरत असल्यावर आक्षेप या आरोपींनी घेतला. त्यानंतर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत त्यांनी या मुस्लीम तरुणाला बेदम मारहाण केली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी हे प्रकरण हाती घेतले असून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.

या घटनेबाबत हाती आलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या बाहेर मंगळवारी रात्री उशिरा एक मुस्लीम तरुण हिंदू मुलीसोबत फिरत होता. यावेळी काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित तरुण लव्ह जिहाद करून हिंदू मुलीला फसवत असल्याचा आरोप केला.

वंचित फॅक्टरने काँग्रेसचा गेम केला, पण २०२४ च्या यशस्वी राजकारणासाठी आंबेडकरांना त्यांचीच गरज!
त्यानंतर त्यांनी या तरुणाला मारहाण करायला सुरुवात केली. या वेळी हे कार्यकर्ते जय श्रीरामच्या घोषणा देत होते. यावेळी बुरखा घातलेली ही तरुणी या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या मारहाणीत तरुणाला गंभीर मार लागला आहे.

माजी आमदार वारीस पठाण यांनी या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला. या आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी आमदार पठाण यांनी केली.

Pawar vs Modi : मोदी यांनी फडणवीसांचे मार्गदर्शन घेतलेले दिसते; शरद पवारांची खोचक टीका
या बाबत अधिक माहिती अशी की, ही तरुणी या मुलासोबत मुंबई शहर सोडून दुसऱ्या शहरात जात होती असे तिच्या कुटुंबीयांना समजले. त्यानंतर कार्यकर्त्यांचा हा जमाव वांद्रे टर्मिनस येथे पोहोचला. हे तरुण तरुणी लखनौला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले होते. त्यावेळी या कार्यकर्त्यांनी डब्यात शिरून तरुण-तरुणीला डब्याबाहेर काढले आणि रेल्वे स्थानकाबाहेर त्याला बेदम मारहाण केली. हे प्रकरण लव्ह जिहादचे आहे, असा दावा या व्हायरल व्हिडिओत करण्यात आला आहे.

राज्यात गतिमान प्रशासनाचा माणगाव पॅटर्न; महसूल विभागात फक्त १० दिवसांत मुलीला मिळाली अनुकंपा तत्त्वावर नोकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed