• Sat. Sep 21st, 2024

कोकणात सापडली चमकणारी अळंबी, लोक झाले आश्चर्यचकित; चमकणाऱ्या मशरूमची जोरदार चर्चा…

कोकणात सापडली चमकणारी अळंबी, लोक झाले आश्चर्यचकित; चमकणाऱ्या मशरूमची जोरदार चर्चा…

सिंधुदुर्ग : कोकणाला निसर्गाचं वरदान समजलं जातं. कोकण म्हटलं की कोकणात नजरेसमोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर, नद्या आणि लांबच लांब समुद्र किनारा. कोकणच्या निसर्ग सौंदर्यात विविध गोष्टी आणखी भर घालत असतात. कोकणात सगळीकडे पसरलेली भातशेती कोकणच्या सौंदर्यात भर घालत असते. कोकणातील हिरवागार निसर्ग पर्यटकांना आकर्षित करत असतो. कोकणचे सौंदर्य हे खरं तर पावसावरच अवलंबून आहे.
Sindhudurg Accident : भरधाव एसटी बसची पिकअप टेम्पोला धडक; ११ प्रवाशी जखमी, वाहनांचे मोठे नुकसान
कोकणात श्रावण महिन्यात रानफुलं बहरून येतात. विविधरंगी अशा या रानफुलांनी कोकण बहरून जातो. निसर्गातील हा चमत्कार पाहायला मिळणं म्हणजे प्रत्येक पर्यटकांसाठी मोठी पर्वणीच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात चमकणारी अळंबी आढळली आहे. तळकोकणात चमकणारी अळंबी पहिल्यांदाचं पहायला मिळाली. ही अळंबी पाहून सर्वांना विशेष वाटतंय. ही अळंबी आता आकर्षणाचं केंद्र बनत चालली आहे.
MBA तरुणाचा अंडे का फंडा! दिवसाला ९ हजार अंड्यांची विक्री अन् लाखोंची उलाढाल
होडावडे या गावात एक अनोखी वस्तू सापडली आहे. वेंगुर्ल्यात चमकणारी अळंबी आढळली आहे. त्यामुळे कोकणातील लोक आश्चर्य चकित झाले आहेत. राज्यात प्रथमच चमकणाऱ्या अळंबीची नोंद झाली आहे.

७० वर्षांचं वाण, कासरलच्या वांग्यांतून महिन्याकाठी ६० हजारांचं उत्पन्न

सध्या श्रवण महिना सुरू आहे. त्यामुळे कोकणातल्या बहुतांश भागांमध्ये (मशरूम) अळंबी जंगल भागात उगवताना दिसतात. आणि ती (मशरूम) अळंबी खाण्यासाठी या महिन्यामध्ये कोकणी माणूस आतुरतेने वाट पाहत असतो. ही अळंबी जंगल भागामध्ये जाऊन शोधावी लागतात. मात्र होडावडे गावात रात्रीची चमकणारी अळंबी सापडल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed