• Mon. Nov 25th, 2024
    दरवाजे तोडून बँकेत प्रवेश; काहीच मिळाले नाही म्हणून मोबाईल चोरला, नंतर पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम

    सोलापूर: शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मंगळवार पेठ परिसरातील महावीर अर्बन को. ऑपरेटिव्ह बँक गुरूवारी रात्री फोडण्याचा प्रयत्न झाला. दोन तरुण चोरट्यांनी तीन दरवाजे तोडून बँकेत प्रवेश केला. पण त्यांच्या हाती काहीच न लागल्याने जाताना फक्त मोबाईल चोरून नेला होता. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
    जळगाव महापालिकेचा भोंगळ कारभार! गटारीच्या उघड्या चेंबरकडे दुर्लक्ष; अंध वृद्ध महिला पडली अन्…
    गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कसून तपास करत सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत चार संशयित चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. खोदा पहाड निकला चुहा, अशी परिस्थिती या संशयित चोरट्यांची झाली होती. कारण बँकेत चोरी साठी जाऊन फक्त एक मोबाईल त्यांच्या हाती लागला होता.सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या चोरीच्या प्रकरणात कृष्णा नारायण चिन्नापागा (२६, रा. बुधवार पेठ, सोलापूर) शेखर काशीनाथ गायकवाड (२२, रा. बसवेश्वर नगर, देगांव नाका, सोलापूर) तेजस सुधाकर बेरूनगी (२०, रा. जुना देगांव नाका, सोलापूर) रोहीत यलप्पा लोणी (२१, रा. साठे-पाटील वस्ती, सोलापूर) अशा चौघांना ताब्यात घेतले आहे.

    सोलापूर शहरातील मुख्य बाजारपेठेतील महावीर को ऑपरेटिव्ह बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने सोलापूर पोलीस प्रशासन हादरले होते. गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत चौकशी सुरू केली. पोलिसांच्या खबऱ्याने सीसीटीव्ही पाहून रिकोर्डवरील संशयित असल्याचे सांगितले. तसेच चोरटे सध्या रेल्वे स्टेशन परिसरात थांबले असल्याची माहिती दिली. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात जाऊन पाहणी केली असता चौघे मैदानात थांबले होते. पोलिसांना पाहून बँकेत चोरी करणारे संशयित चौघे पळू लागले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चारही बाजूंनी वेढा घातला आणि चौघांना ताब्यात घेतले.

    परदेशी भाज्या विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला नामांकित कंपनीनं घातला ७० लाखांना गंडा

    मंगळवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या महावीर को ऑपरेटिव्ह बँकेत चोरीसाठी गेले. बँकेचे तीन दरवाजे तोडून आत
    प्रवेश केला. लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला होता, पण लॉकर तुटले नाही. शेवटी संशयित चोरट्यांनी फक्त एक मोबाईल घेऊन निघून गेले होते. हे सर्व दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते. संशयित चोरट्यांनी मोठी बँक फोडली होती, पण त्यांच्या हाती काहीही लागले नव्हते. खोदा पहाड निकला चुहा, अशी परिस्थिती संशयित चोरट्यांची झाली होती. या संशयितांना ताब्यात घेताना गुन्हे शाखेचे एपीआय संजय क्षीरसागर, दिलीप किर्दक, सचिन होटकर, महेश शिंदे, राजु मुदगल, सैपन सय्यद, कुमार शेळके, अजिंक्य माने, प्रकाश गायकवाड, अविनाश पाटील, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड यांनी महत्वाची कामगिरी केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *