• Sat. Sep 21st, 2024
४ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व; १८ हून अधिक पदके, खेळाडूवर आली चहा पोहे विकण्याची वेळ

नागपूर: दिव्यंगत्वसह जगणे आणि जीवनातील सर्व अडचणींना तोंड देणे ही प्रत्येकासाठी सोपी गोष्ट नाही. मात्र हेच दिव्यंगत्व आणि आत्मविश्वासाच्या जोरावर विजय मिळवणारा खेळाडू म्हणजे संदीप गवई. ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंदाजीमध्ये ४ वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या संदीपने ४ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरांवर त्याने १८ मेडल पटकावले आहेत.
कौतुकास्पद! ना कोणता क्लास ना अकॅडमी; स्वयं अध्ययनाच्या बळावर पठ्ठ्याची कमाल, थेट एनआयटीमध्ये निवड
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप एका पायाने दिव्यांग आहे. या पदकांच्या भरवशावर शासकीय नोकरी मिळेल, अशी त्याला अपेक्षा होती. पण तीही फोल ठरली आहे. आपल्या स्वप्नांच्या आड कोणी येऊ शकत नाही, याचे मूर्तिमंत उदाहरण नागपुरातील एक दिव्यांग खेळाडूने घालून दिले आहे. तो खेळाडू म्हणजे संदीप गवई. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंदाजीमध्ये ४ वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. नशिबाने त्याच्यासोबत खेळ केला असेल, पण त्याच्या आत्मविश्वासाच्या जोरावर संदीपने अनेकवेळा स्वत:ला सिद्ध करून यश मिळवले आहे. मात्र शासनाच्या खेळाडूप्रती असलेल्या उदासीन वृत्तीमुळे आज जागतिक स्तरावर पदक जिंकणाऱ्या खेळाडूला चहा आणि पोहे विकून आपला उदरनिर्वाह करावा लागत असल्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

शासन दरबारी अनेकदा सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देण्यात आले. अनेकदा त्याचा पाठपुरावा करण्यात आला. मात्र सरकार केवळ कागदी घोडे चालवण्यात व्यस्त असल्याने आज परिस्थितीशी हताश झाल्याने या खेळाडूला हा व्यवसाय करण्याची वेळ आली आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या संदीप गवई हे पॅरा आर्चरी खेळाडू असून गेल्या १४-१५ वर्षांपासून त्यांनी देशासाठी अनेक स्पर्धा खेळून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. चार आंतरराष्ट्रीय स्पर्धांसह राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये १८ हून अधिक पदके जिंकली आहेत. त्यात सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचाही समावेश आहे. संदीप एका पायाने अपंग आहे आणि पोलिओमुळे ४२% अपंग आहे.

७० वर्षांचं वाण, कासरलच्या वांग्यांतून महिन्याकाठी ६० हजारांचं उत्पन्न

२०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेल्या सामान्य आणि दिव्यांग खेळाडूंना रोजगार देण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले. त्यासाठी अनेक खेळाडूंची यादीही जाहीर करण्यात आली. यासोबतच कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. मात्र २०१८ ते २०२३ या पाच वर्षांच्या कालावधीत कोणतीही कार्यवाही झाली नाही. आम्ही वेळोवेळी सरकारकडे संपर्क साधला, परंतु अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. आपल्यासारख्या दिव्यांग खेळाडूंना शासनाने प्रोत्साहन दिले तर संबंधित मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे. कारण त्यामुळे आपल्या खेळाडूंचे देशासाठी काहीतरी करण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

माझ्या घरची परिस्थिती नाजूक आहे. घरी माझी पत्नी, दोन मुले आणि वृद्ध वडील आहेत. माझ्या खेळासाठी अनेक संस्था आणि समाजातील मान्यवरांनी मला उदारपणे मदत केली आहे. धनुर्विद्या हा खूप महागडा खेळ असला तरी समाजातील लोकांचा पाठिंबा आणि विश्वास यामुळे या खेळात मी माझ्या देशासाठी काहीतरी करू शकलो, याचा मला खूप आनंद आहे. पण घरची परिस्थिती आणि खेळ यांच्यात समतोल साधणे माझ्या आवाक्याबाहेर जात असल्याने आणि सरकारी न्यायालयाच्या सततच्या दुर्लक्षामुळे अखेर परिस्थिती बिकट बनत चालली आहे. मी माझ्या दारात चहाचा टपरी लावून आपला उदरनिर्वाह करत आहे, असे संदीप म्हणाले.
शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास! नदीत विषारी साप; मात्र जिद्द कायम, थर्माकोलवर बसून विद्यार्थ्यी…
ते पुढे म्हणाले की, याबाबत मी वेळोवेळी अनेक लोकांशी चर्चा करून माझ्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या. पण मला आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. सरकार काही काळ माझ्याबाबत उदासीन असले तरी मला त्याचे अधिक दु:ख झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांना मी प्रशिक्षण देतो, त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने त्यांच्या मनात माझी अवस्था पाहून अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित करणारी माझी व्यथा आहे. ते पुढे हे क्रीडा क्षेत्र निवडताना विचार करतील. माझ्यासारख्या खेळाडूच्या बाबतीत असे घडले तर इतरांच्या मनात नकारात्मक विचार येतील, असे मत संदीप यांनी बोलताना व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed