धाराशिव : अधिक श्रावण मास आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांच्या संख्येत वाढ होणार आहे. वाढणारी गर्दी लक्ष्यात घेऊन तुळजा भवानी मंदिर संस्थानने तुळजा भवानीचे मंदिर सलग २२ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दिवशी रात्री १ वाजता चरणतिर्थनाने मंदिर उघडले जाणार आहे. तसेच सकाळी ६ वाजता अभिषेक घाट होणार आहे.
रात्री ११ वाजता प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर तुळजा भवानीचे मंदिर बंद होणार आहे. सध्या अधिक मासाचा महिना सुरू असुन राज्यातील तसेच परराज्यातील भाविक तुळजा भवानीच्या दर्शनासाठी तुळजा भवानीच्या मंदिरात दाखल होत आहेत. त्यातच सलग सुट्ट्या लागून आल्यामुळे भाविकांच्या संख्येत लक्षनिय वाढ झाली आहे.

भाविकांचे व्यवस्थित दर्शन व्हावे तसेच कुलाचार व्यवस्थित व्हावा म्हणून तुळजा भवानी मंदिर २२ तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाचा फायदा लाखो भाविकांना होणार आहे.