• Tue. Mar 17th, 2026

    सतत वाद आणि घटस्फोटाचा खटला, निवृत्त शिक्षिका असलेल्या पत्नीला पतीने संपवलं, थरारक घटना

    सतत वाद आणि घटस्फोटाचा खटला, निवृत्त शिक्षिका असलेल्या पत्नीला पतीने संपवलं, थरारक घटना

    नागपूर : सतत होत असलेल्या वादातून पतीने कुऱ्हाडीने वार करून निवृत्त शिक्षिका असलेल्या पत्नीची हत्या केली. ही थरारक घटना रविवारी सकाळी कोराडी पोलिस स्टेशन हद्दीतील शंभूनगर परिसरात ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून मारेकरी पतीला अटक केली आहे. पुरुषोत्तम अंबिकापती सिन्हा (वय ६६) असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव आहे. तर मुकूलकुमारी पुरुषोत्तम सिन्हा (वय ६३) असे मृत महिलेचे नाव आहे.
    भाजप नेत्या सना खान हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुख्य आरोपीला अटक, धक्कादायक माहिती समोर
    गेल्या अनेक वर्षांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. एक वर्षापूर्वी मुकूलकुमारी यांच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी पुरुषोत्तम यांच्याविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल केला होता. याशिवाय दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्यांचीही नोंद पोलीस दफ्तरी आहे. घटस्फोटाचा खटलाही न्यायालयात सुरू आहे.

    नागपुरात जुगारासाठी बनावट नोटांचा जुगाड; मध्यप्रदेशातील टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक
    दोघांची देखभाल करण्यासाठी दोन काळजीवाहक आहेत. रविवारी सकाळी मुकूलकुमारी व पुरुषोत्तम यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेला. पुरुषोत्तम यांनी मुकूलकुमारी यांच्या डोक्यावर कु्ऱ्हाडीने वार केले. यात मुकूलकुमारी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरुषोत्तम घराबाहेर पडले. काळजीवाहक खोलीत गेले असता मुकुलकुमारी या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. हे दृश्य बघून काळजीवाहक घाबरले. घर सोडून ते पसार झाले.

    ऑनलाइन गेमच्या नावाखाली फसवणूक, बिझनेस पार्टनरनेच ५८ कोटींना घातला गंडा

    दरम्यान, एका नागरिकाने घटनेची माहिती कोराडी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांना ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पुरुषोत्तम यांना अटक केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *