“तुम्हाला लाँग ड्राईव्हला जायला आवडतं, हे मला माहिती आहे. कल्पना करा की संपूर्ण कोस्टल रोड खुला झाला आहे. लाँग ड्राईव्हवर जाण्यासाठी तुमच्याकडे दोन गाड्यांचा पर्याय आहे. एक गाडी महात्मा गांधी चालवत आहेत, तर दुसरी गाडी वीर सावरकर चालवत आहेत. तुम्ही कुठली गाडी निवडाल?” असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला.
यावर देवेंद्र फडणवीस चटकन म्हणाले, की “मला स्वतः ड्राईव्ह करायला आवडेल. मी त्यांना विचारेन, की मी गाडी चालवत असताना जो कोणी माझ्या गाडीत बसायला तयार असेल. त्याचे स्वागतच आहे” असं फडणवीस म्हणताच उपस्थितांमधून हशे आणि टाळ्या आल्या.
देवेंद्र फडणवीसांना विचारलेले राजकीय रॅपिड फायर
प्रश्न : कोणत्या पक्षासोबत तुम्ही कधीच युती करणार नाही?
उत्तर : काँग्रेस
प्रश्न : काँग्रेस नेत्यांव्यतिरिक्त कोणाशी तुम्ही कधीच युती करणार नाही?
उत्तर : राजकारणात आम्ही शत्रू कधीच नसतो, तर एकमेकांचे राजकीय विरोधक असतो. आम्ही काँग्रेसच्या धोरणांच्या विरोधात आहोत. त्यामुळे जो नेता काँग्रेसच्या विचारधारेशी चिकटून राहील, त्याच्याशी कधीच युती करणार नाही
प्रश्न : महायुतीत नसलेल्या कोणत्या नेत्याचे तुम्हाला कौतुक वाटते?
उत्तर : बरेच नेते आहेत, पण राजकारणात तुम्ही हे उघडपणे सांगू शकत नाही. कारण जर तुम्ही म्हणालात की, या पक्षातील हा नेता मला चांगला वाटतो, तर लगेच तेवढ्या भागाचा व्हिडिओ कापून पसरवला जातो, आणि मग ते म्हणतात, की बघा श्रीयुत देवेंद्र फडणवीस हे माझं किंवा आमच्या नेत्याचं किंवा आमच्या पक्षाचं कौतुक करत आहेत. हे माझ्यासाठी खूप कठीण होऊन बसेल. त्यामुळे तुम्ही मला खाजगीत भेटा, त्या गप्पांमध्ये मी तुम्हाला तीन नेत्यांची नावं सांगेन, ज्यांचा मी प्रशंसक आहे.
पाहा व्हिडिओ :