• Sat. Sep 21st, 2024
Mumbai Crime: मोठी बातमी: आयएस प्रकरणी सहावा दहशतवादी अटकेत; एनआयएची धडक कारवाई

मुंबई : ‘आयएस’ दहशतवादी संघटनेचा ‘स्लीपर सेल’ म्हणून कार्यरत असलेल्या सहाव्या दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली आहे. शामिल साकिब नाचन असे त्याचे नाव असून, भिवंडीजवळील पडघ्यातून त्याला अटक करण्यात आली. शामिल हा मुंबई उपनगरीय रेल्वेतील बॉम्बस्फोट खटल्यातील दहशतवादी साकिबचा मुलगा आहे.

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (आयएस) या दहशतवादी संघटनेला दहशतवादी पुरविण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देणाऱ्या मॉड्यूलवर ‘एनआयए’कडून कडक कारवाई सुरू आहे. या अंतर्गत ‘एनआयए’ने यापूर्वी पुणे, ठाणे आदी भागांत कारवाई करून तबिश नासर सिद्दीकी, झुबीर नूर महंमद शेख, अदनान सरकार, शर्जिल शेख व झुल्फिकार अली बारुदवाला यांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांच्या आठवडाभरापूर्वीच भिवंडीत छापा टाकून आफिफ नाचन याला अटक केली. त्यानंतर आता शुक्रवारी शामिल नाचन याला अटक करण्यात आली आहे.

भाजप नेत्या सना खान हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुख्य आरोपीला अटक, धक्कादायक माहिती समोर
‘एनआयए’ने दिलेल्या माहितीनुसार, शामिल हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी ‘आयईडी’ हे उपकरण तयार करून त्याचे प्रशिक्षण व चाचणी करण्याचे कृत्य करीत होता. त्यासाठी तो मागील वर्षी पुण्यातील कोंढवा येथे गेला होता. तेथील एका घरात हे सर्व आरोपी दहशतवादी कृत्य घडवून आणण्याच्यादृष्टीने बॉम्ब तयार करणे व बॉम्बस्फोट घडविण्याच्या कार्यशाळेत सहभागी झाला होता. दहशतवादाचा आरोप असलेले हे सर्व आरोपी ‘आयएस’ च्या मॉड्युलवर काम करीत होते.

भाजपमधील नाराजी चव्हाट्यावर; मेधा कुलकर्णी स्पष्टच बोलल्या…, सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed