• Sat. Sep 21st, 2024

लेकाने आईचे पांग फेडले, तिच्या सर्व इच्छा केल्या पूर्ण अन् निधनानंतरही पालखीतून काढली अंत्ययात्रा

लेकाने आईचे पांग फेडले, तिच्या सर्व इच्छा केल्या पूर्ण अन् निधनानंतरही पालखीतून काढली अंत्ययात्रा

कोल्हापूर : आई या दोन अक्षरी शब्दात आपल संपूर्ण आयुष्य सामावलेलं असतं. अगदी जन्मल्यापासून अगदी पायाला ठेच लागली तरी आपल्या तोंडातून आई शब्दाचा उच्चार येतोच. सध्याच्या युगात अनेक जण आपला जन्मदात्या माता-पिताला वृद्धाश्रमात पाठवतात. तर अनेक वेळा मुलगा सांभाळत नाही म्हणून वयोवृद्ध आईला काम करावं लागतं. पण कोल्हापुरातील मुलाने आपल्या आईसाठी जे केलं ते म्हणजे समाजासमोर एक आदर्शच आहे.
Success Story : पत्रकार ते पोलीस! डोक्याला गंभीर इजा पण स्वप्नांनी झोप उडवली, वाचा कोल्हापुरच्या पोराची यशोगाथा
एका बाजुला आत्ताची पिढी संस्कार, प्रेम विसरत जात असतानाच कोल्हापुरातील कागलमधील उंदरवाडी येथील एका मुलाने आपल्या आईचे निधन झाल्यानंतर तिची पालखीतून अंत्ययात्रा काढली आहे. या अंत्ययात्रेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. याची चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे.
लष्करातील जावयाला ऑनलाइन दिला अधिक मासचा वाण, ठोमके कुटुंबीयांनी असा केला मानपान
कोल्हापुरातील कागल तालुक्यातील उंदरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ता असलेले मारुती पाटील यांचे आईवर अत्यंत प्रेम होते आणि आदर होता. आई भगिरथी शिवाजी पाटील यांनी बिकट परिस्थितीत मोलमजुरी करून पोरांना वाढवलं खूप कष्ट सोसले. त्यामुळे मारुती पाटील कमवते झाले आणि तेव्हापासून आपल्या आईला त्यांनी काही कमी पडू दिले नाही. आईला विचारून तिच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न ते करत असत. काही दिवसांपूर्वीच सर्व नातेवाईकांना बोलावून आईचे पाद्यपूजन कार्यक्रमही त्यांनी केला. तर एक वर्षापूर्वीच त्यांनी आईच्या निधनानंतर पालखीतून अंत्ययात्रा काढणार असल्याचे ठरवले होते. त्यानंतर सरवडे येथील सुतार बंधूकडे पालखी बनवण्यासाठी सांगितले. एक वर्षापूर्वीच पालखी तयार झाली होती. आणि काल बुधवारी वयाच्या ८७ व्या भगिरथी शिवाजी पाटील यांचे निधन झाले.

वडील गेल्यानंतर भेळपुरीचा गाडा थाटला; ‘अग्निवीर’ भावांची सैन्य दलात भरती, गावात जंगी मिरवणूक!

आईचे निधन झाल्यावर तिची अंत्ययात्रा त्याच पालखीतून काढण्यात आली. याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आणि याची चर्चा सर्वत्र होत आहे. भगिरथी ह्या उंदरवाडी गावच्या सरपंच अनिता पाटील यांच्या सासू व सामाजिक कार्यकर्ते मारुती पाटील यांच्या मातोश्री होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed