यंदाच्या वर्षीचा हा विशेष बाप्पा असेल असं म्हणायला हरकत नाही. कारण, नवी मुंबईतील कोपरखैराणे इथल्या मोरया कला व क्रीडानिकेतन मंडळाने (कोपरखैरणे चा इच्छापूर्ती) या वर्षी गणेशोत्सवाला बाप्पाची अगदी पर्यावरणपूरक आणि खास मूर्ती साकारली आहे. जगात पहिल्यांदाच असा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. या मंडळाचे अध्यक्ष ऋषीकेश शिवाजी पालवे यांनी सांगितले की, यंदाच्या गणेशोत्सवाचे सगळ्यात विशेष म्हणजे या मंडळातील बाप्पाच्या मूर्तीमध्ये तुम्हाला संपूर्ण अष्टविनायकाचं दर्शन होणार आहे, अशी माहिती या मंडळाचे अध्यक्ष देतात, कसं? ते नक्की वाचा….
तुम्हास वाहिलेल्या फुलांपासून तुम्हास घडविणार…
मंडळी, निसर्गाचा होणारा ऱ्हास आणि पर्यावरणाला होणारा धोका टाळण्यासाठी या मंडळाने फुलांचा बाप्पा साकारला आहे. यामध्ये अष्टविनायक आणि दगडूशेठ गणपतीला वाहिलेल्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. संस्थानातून गणरायाला वाहिलेल्या फुलांपासून या बाप्पाची सूबक मूर्ती घडवण्यात आली आहे. तर या संकल्पनेअंतर्गत पर्यावरणाचे संवर्धन आणि जतन करण्याचा महत्त्वाचा संदेश भक्तापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं मंडळाच्या अध्यक्षांकडून सांगण्यात आलं.
फुलांपासून बनलेली पर्यावरणपूरक मूर्ती
कोपरखैराण्याचा इच्छापूर्ती दरवर्षी इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देतो. यंदाच्या त्यांच्या याच संकल्पनेला साथ दिली ती प्रख्यात मूर्तीकर श्री राजन विठ्ठल झाड आणि त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र विधिष राजन झाड यांनी. राजन झाड यांनी फुलांपासून बनवलेली ही मूर्ती जगात पहिल्यांदाच साकारण्यात आली आहे. त्यामुळे यंदा हा बाप्पा पाहण्यासाठी नक्की या….
या मंडळाविषयी आणखी खास गोष्ट सांगायची म्हणजे, बाप्पाची ही १२ फुटी उंच मूर्ती ३५ किलोमीटर पायी निरंतर प्रवास करत ट्रॉलीवर खेचत मंडळाच्या कार्यकर्त्यान द्वारे आणली जाते. यासाठी ईको फ्रेंडली व सस्तेनेबल डेकोरेशनही केलं जातं. तर मंडळाचे टीशर्ट वाटताना १ टीशर्ट १ झाड अशी संकल्पनाही श्रीमान फाउंडेशनसोबत मिळून राबवण्यात आली आहे. आणि या वर्षी शक्य होतील तितके झाडे लावायचा मंडळाचा माणसं आहे. इतकंच नाहीतर दरवर्षी भक्तांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन, गणरायाची भनोभावे आरती आणि भजनही मंडळातील तरुण पिढी मोठ्या उत्साहाने करत असते.