आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही गावाने प्रथेचे कडक पालन केले आहे. अधिक मासात प्रत्येक सासुरवाडीत जावयांना धोंडे खाऊ घालण्याची प्रथा असते. मात्र या परंपरेला पिंपळगाव उज्जैनी हे गाव अपवाद ठरले आहे. या गावाची अधिक मासातील प्रथा नेमकी उलटी आहे.
या गावात कुणीच जावयांना धोंड्याचे जेवण खाऊ घालण्यासाठी घरी आमंत्रित करीत नाहीत. ही प्रथा कशी पडली, यामागचं नेमके काय कारण आहे?, याची माहिती गावातील कोणालाही सांगता येत नाही इतकी ही परंपरा जुनी आहे. मात्र येथे ते एक गोष्ट सांगतात की, कधी एकेकाळी गावात गोळ्याच्या आजार आला होता. गोळा उठायचा आणि माणसं मारायची… एका व्यक्तीचा अंत्यविधी करून येत नाही तोच दुसरा व्यक्ती गोळ्यामुळे मरण पावत होता. त्यामुळे ते गोळे आपल्या गावात करायचे अन् धोंडे बंद करायचे, असे ठरले.
कारण धोंडे हे पुरणाचे गोळे असतात. धोंडे केले तर गावावर संकट येते असे इथल्या लोकांचा समज आहे. यामुळे गावाने अधिक मासात जावयांना धोंड्यांचे जेवण खाऊ घालण्याची प्रथाच एकमुखाने बंद केली.
बदलत्या काळानुसार जावयांना जेवणासाठी बोलतात. कुवतीप्रमाणे इतर भेटवस्तू दिल्या जातात. पुरणपोळी जेवण केले जाते मात्र धोंडे दिले जात नाहीत. या गावचे मुलं आपापल्या सासरवडी जाऊन धोंडे जेवण करून येतात.