• Sat. Sep 21st, 2024
पोटी तीन मुली; पती-पत्नी घरातून अचानक बेपत्ता, आता धक्कादायक माहिती आली समोर

नांदेड: घरातून अचानक निघून गेलेले पती-पत्नी विष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात पत्नीचा मृत्यू झाला असून पतीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. अर्धापूर तालुक्यातील दाभड शिवारातील एका शेतात शनिवारी सकाळी दोघे विष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले. ललिता डोंगरे आणि कैलाश डोंगरे असं दांम्पत्याचे नाव नाव आहे.
विद्यार्थी दशेतच निवडणुका; शाळेचा अभिनव उपक्रम, कोल्हापुरातील प्रशाला चर्चेत
मृत ललिता डोंगरे आणि कैलाश डोंगरे हे दांम्पत्य शहरातील वसरणी येथील रहिवासी आहेत. दोघे जण मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करायचे. त्यांना तीन मुली असून एका मुलीचे लग्न देखील झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी दुपारी दांम्पत्य घरातून अचानक निघून गेले. उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा शोध काही लागला नाही. अखेर दाभड शिवारात सकाळी दोघे विष प्राशन केलेल्या अवस्थेत काहींना दिसून आले. नागरिकांनी तात्काळ अर्धापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना घटनास्थळी ललिता डोंगरे ह्या मृत अस्वस्थेत आढळून आल्या, तर कैलाश डोंगरे अत्यवस्त होते.

समृद्धी झाली अतिवेगानं इथं पोकळ आश्वासन, मुंबई-गोवा हायवेचं कामच रखडलं! कोकणवासियांनी मांडली व्यथा

याशिवाय पोलिसांना घटनास्थळी शेतात फवारणीसाठी लागणारे कीटकनाशक औषधाचे दोन छोटे बॉटल्स आणि देशी दारूची बॉटल देखील आढळून आली. पोलिसांनी तात्काळ कैलास डोंगरे यांना रुग्णवाहिकेने शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान या दांम्पत्याने टोकाचे पाऊल का उचलले, या मागचे कारण काय हे मात्र समजू शकले नाही. घटनेनंतर अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती. घटनास्थळापासून काही अंतरावर मयत महिलेचा भाऊ राहत होता. तिथे तो सालगडी म्हणून काम करायचा. या घटनेने वसरणी गावात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed