• Tue. Nov 26th, 2024
    ईव्हीएमविरोधात पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं, कायदेशीर लढा उभारण्याचं शरद पवारांनी ठरवलं

    NCP Sharad Pawar Opposing EVM : विधानसभा निवडणुकीत महायुतीने आता आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षे महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर राहावे लागणार आहे. असे असले तरी निवडणूक निकालातील चकीत करणारे आकडे पाहता महाविकास आघाडीतील पराभूत उमेदवारांसह प्रमुख नेत्यांनी ईव्हीएमविरोधात भूमिका घेतली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीने आता आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षे महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर राहावे लागणार आहे. असे असले तरी निवडणूक निकालातील चकीत करणारे आकडे पाहता महाविकास आघाडीतील पराभूत उमेदवारांसह प्रमुख नेत्यांनी ईव्हीएमविरोधात भूमिका घेतली आहे. आत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने ईव्हीएम प्रणालीवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. ईव्हीएमची आकडेमोड आणि टक्केवारी याविरोधात ठोस भूमिका घेण्याचे विरोधी पक्षांनी ठरवले आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील विजयी आमदारांकडूनही संशय व्यक्त केला जात आहे. यातच शशरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा ईव्हीएम विरोधात मोठं आंदोनलन उभे करणार असल्याची भूमिका घेतली आहे.

    बैठकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या आमदार तसेच पराभूत उमेदवारांनी केलेल्या तक्रारी संदर्भात वकिलांची एक टीम तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यासोबतच आणि केंद्रीय पातळीवरही ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठित करण्यात आली असल्याचे समजते. शरद पवारांकडून केवळ तोंडी आरोप करण्यापेक्षा ईव्हीएमबाबत जे आक्षेप आहेत किंवा निवडणूक प्रक्रियेत ज्या चुकीच्या बाबी घडल्या, ते सर्व पुरावे गोळा करण्याच्या सूचना देखील उमेदवारांना देण्यात आल्या आहेत.
    EVMमुळे महायुतीचा विजय? रोहित पवारांनी उमेदवारांच्या नावांसह आकडे मांडले, थेट पुरावाच दाखवला
    दरम्यान २८ तारखेपर्यंत व्हीव्हीपॅट तपासणीसाठी वेळ असल्याने उमेदवारांनी तात्काळ व्हीव्हीपॅटची तपासणी कराव, अशा सूचना पराभूत उमेदवारांना बैठकीत देण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील पत्राची प्रत शेअर करण्यात आल्याने ही माहिती समोर आली आहे. राज्य पातळीवर ज्याप्रकारे ईव्हीएम विरोधात ठोस भूमिका घेतली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पाळीवर इंडिया आघाडी देखील लढाई लढणार असल्याची माहिती शरद पवारांनी उमेदवारांना दिली आहे. काहीही झालं तरी, आता लढायचं, असा संदेशच शरद पवारांनी दिला आहे. त्यामुळे, ईव्हीएमविरोधातील लढाई आता तीव्र होणार असल्याचे दिसून येते.
    राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नवनिर्वाचित आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही निकालाच्या दोन दिवसांनंतर ईव्हीएम प्रणालीबाबत आपल्या एक्स हँडलवर भूमिका मांडलीा होती. त्यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी मजमोजणीच्या वेळी कसे सजग राहून काम केले, याबाबत विस्तृत माहिती दिली. आणि यामुळेच मला मी मोठ्या मताधिक्क्याने निवडून येऊ शकलो असेही आव्हाडांनी नमूद केले होते.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed