• Mon. Nov 25th, 2024

    पारनेर तालुक्यातील हे गाव लावणार दहा हजार झाडे, हरित क्रांती घडवण्याचा निर्धार

    पारनेर तालुक्यातील हे गाव लावणार दहा हजार झाडे, हरित क्रांती घडवण्याचा निर्धार

    पारनेर, अहमदनगर : सामाजिक वनीकरण व ग्रामपंचायत नांदूरपठार यांच्या संयुक्त विद्यमाने नांदूरपठारमध्ये दहा हजार झाडे लावण्यात येऊन त्याचे संवर्धन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. सामाजिक वनीकरणाच्या बिहार पॅटर्न अंतर्गत चौधरी वस्ती-टेंभी ते आदर्श वसाहत रस्त्यावर वृक्ष लागवड महोत्सवास सुरुवात करण्यात आली आहे. गावामध्ये ज्या ठिकाणी शक्य आहे तेथे दहा हजार झाडे लावण्यात येणार आहेत.

    नवलेवाडी ग्रामपंचायतचा ऐतिहासिक निर्णय; संपूर्ण देशात चर्चा, फक्त यांनाच मिळणार संपत्तीत वाटा
    सरपंच चौधरी यांनी याबाबत अधिक माहिती दिली. वृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. त्यामुळे अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी भीषण दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. बेसुमार वृक्ष तोडीमुळे निसर्गातील जैवविविधता नष्ट होऊ लागली असून त्याचे दुष्परिणामही जाणवू लागले आहेत, असे चौधरी यांनी सांगितले.
    हरिश्चंद्रगडावर ६ तरुण भरकटले; पावसामुळे थंडीने गारठले, एकाचा दुर्दैवी अंत
    पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. केवळ फोटोसाठी वृक्षारोपण न करता लावण्यात आलेल्या झाडांचे संवर्धन करून जास्तीत जास्त झाडे कशी जगतील याची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नांदूरपठारच्या ग्रामस्थांनी एकमुखाने वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या बिहार पॅटर्न अंतर्गत झाडे लावण्यात येत आहेत. दहा हजार वृक्षांचे रोपण करून गावात हरित क्रांती करण्याचा आम्ही निर्धार केला आहे. आमचा हा संकल्प आम्ही पूर्णत्वास नेणार असल्याचे सरपंच चौधरी यांनी सांगितले.

    साईबाबा मंदिर तर आवडलं पण बाबांचा महाप्रसादही ‘लय भारी’, राष्ट्रपतींकडून आचाऱ्यांना राजधानी दिल्लीचं निमंत्रण

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed