अहमदनगर : आपल्या मुलांसाठी आई-वडील जिवाचं रान करतात, मुलांचं कल्याण व्हावं यासाठी रात्रंदिवस कष्ट करत असतात. मात्र काही मुलं आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करत नाही. आता या संदर्भात अहमदनगर जिल्ह्यातील नवलेवाडी या छोट्या ग्रामपंचायतीने मोठा निर्णय घेतल आहे.
आपल्या आई-वडिलांना सांभाळणाऱ्या मुला-मुलींनाच वडिलोपार्जित संपत्तीत हक्क देणार असल्याचा महत्त्वपूर्ण ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. आणि जे मुलं-मुली आई-वडिलांचा सांभाळ करणार नाही, त्यांच्या वारसा हक्काची नोंद ग्रामपंचायतीमध्ये लागणार नाही. कदाचित असा निर्णय घेणारी ही ग्रामपंचायत महाराष्ट्रातील पहिलीच असावी.
आजकाल वयोवृद्ध आई-वडील मुलांसाठी ओझे झाल्याचं चित्र अनेकदा बघायला मिळतं. शहरातील हे लोण आता ग्रामीण भागातही पोहोचताना दिसतंय. त्यामुळे वयोवृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यास संपत्तीमधून बेदखल करण्याचा आदर्श निर्णय अकोले तालुक्यातील नवलेवाडी ग्रामपंचायतने घेतला आहे. जी मुलं-मुली आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करतील त्यांनाच वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा दिला जाणार आहे, असा आदर्श निर्णय ग्रामपंचायतने घेतला आहे.

काय म्हणाले सरपंच?
आमच्या ग्रामपंचायतमध्ये मालमत्तेत हिस्स्याच्या संदर्भात काही मुलांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर संबंधित मुलांच्या वडिलांची आम्ही भेट घेतली. मुलं आम्हाला सांभाळत नाही, असं अनेकांनी सांगितलं. त्यानुसार आम्ही ग्रामसभेत एक निर्णय घेतला. जे कोणी नवलेवाडीचे ग्रामस्थ असेल आणि आपल्या आई-वडिलांना सांभाळत नसेल तर ग्रामपंचायत कठोर निर्णय घेईल. आणि अशा लोकांच्या वारसाची नोंद ही ग्रामपंचायतमध्ये होणार नाही. महसूल विभागाला आम्ही पत्र पाठवू आणि आमच्या ग्रामपंचायतची शिफारस असली तरच या मुलांची आई-वडिलांच्या प्रॉपर्टीत नोंद करावी, अशी मागणी करणार असल्याचं सरपंच विकास नवले यांनी सागितलं.